Naxalite यांचे अराजकता एकमेव ध्येय; कोणतेही राजकीय उद्दिष्ट नाही

28
– विजय फणशीलकर 

देशातल्या गेल्या सहा दशकांतील नक्षलवादांच्या (Naxalite) इतिहासामधील उपलब्ध प्रत्येक पुरावा हे सिद्ध करतो की, डाव्या विचारधारेतील कट्टरपंथी यांनी त्यांचा राजकीय उद्देश साध्य केलेला नाही, त्यासाठी त्यांनी वेळोवेळो मोठ्या संख्येने लोकांच्या हत्या केल्या, तरीही त्यांनी ते साध्य केलेले नाही. भारताच्या सीमापार शत्रू राष्ट्रांकडून नक्षलवाद्यांना मोठ्या प्रमाणात साधनसंपत्ती, पैसा, तंत्रज्ञान आणि शस्त्रास्त्रे मिळत आहेत. तरीही नक्षलवावाद्यांना काहीही ठोस साध्य करता आले नाही. भारतासारख्या मोठ्या देशाला हे नक्षलवादी जराही हलवू शकले नाहीत.

(हेही वाचा लाल संविधान नाही नोटपॅड, खुद्द काँग्रेस नेत्याने केली Rahul Gandhi यांच्या नॅरेटिव्हची पोलखोल)

हे वास्तव नक्षलवाद्यांच्या सूत्रधारांना लक्षात आले, तरीही त्यांनी अर्ध्या भारतात फक्त एका उद्देशाने अर्धशतकांहून अधिक काळ हिंसक विध्वंस चालू ठेवला आहे. राज्यात  सरकार चालवण्यास अपयशी ठरले असल्याची प्रतिमा त्यांच्याकडून निर्माण केली जाते. खरे तर, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश किंवा छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी  (Naxalite) अतिशय मोठे सशस्त्र हल्ले केले, ज्यात अनेक नागरिक आणि राजकीय नेत्यांचे प्राण गेले, पण त्यापैकी काहीही नक्षलवाद्यांना त्यांच्या तथाकथित राजकीय उद्दिष्टापर्यंत पोहचता आले नाही. आता आणखी एक नक्षलवादी ‘रणनीती’ आली आहे, तीही अपयशी ठरणार आहे. पण मग, नक्षलवाद्यांना त्यांचा अराजकवाद चालू ठेवावा लागेल, कारण त्यांना त्यांच्या सीमापार नेतृत्वाकडून दबाव येत आहे. तरीही हे सत्य आहे की, हिंसाचाराच्या कृत्याने नक्षलवादी भारताला कोणत्याही प्रकारे अस्थिर करू शकत नाही.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.