राहुल गांधी खोटे बोलणारी फॅक्टरी; Amit Shah यांचा हल्लाबोल

85

कर्नाटक, हिमाचल प्रदेश, तेलंगाणाच्या निवडणुकीत काँग्रेसने आश्वासनांचे पेटारे उघडले आणि निवडणुका जिंकल्या. परंतु, आश्वासने पाळली नाहीत. आता सांभाळून आश्वासने द्या, असे जर काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष म्हणत असेल तर ती पार्टी आश्वासने पाळू शकते का?, असा सवाल करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी (Amit Shah) काँग्रेसवर हल्लाबोल केला. राहुल गांधी ही खोटे बोलणारी फॅक्टरी आहे. तरुणांनी त्यांच्या नादी लागू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रचार सभेत बोलताना अमित शाहा म्हणाले की, आमची आश्वासने खटाखट, फटाफट सारखी नसतात दिवंगत इंदिरा गांधींनी ‘वन रँक, वन पेन्शन’ योजनेचे आश्वासन दिले होते. परंतु, चाळीस वर्षात काँग्रेसने ते आश्वासन पाळले नाही. शेवटी नरेंद्र मोदींनी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली. आमच्या आश्वासनांना काँग्रेसने ‘चुनावी जुमला’ म्हटले. परंतु, मोदींनी ती आश्वासने पूर्ण करून दाखवली. वन रँक, वन पेन्शन’ योजनेतून 1 लाख 55 हजार कोटी रुपये जवानांच्या कुटुंबांना दिले. आमची आश्वासने तुमच्या खटाखट, फटाफट सारखी नसतात, असा टोलाही शाहांनी (Amit Shah) काँग्रेसला लगावला.

(हेही वाचा लाल संविधान नाही नोटपॅड, खुद्द काँग्रेस नेत्याने केली Rahul Gandhi यांच्या नॅरेटिव्हची पोलखोल)

आम्ही अयोध्येत मंदिर बांधून दाखवले

अयोध्येतील राम मंदिराचा विषय काँग्रेसने 75 वर्षे लटकवत, भटकवत ठेवल्याचा घणाघाती आरोप अमित शाहांनी केला. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही अयोध्यामध्ये मंदिराचे भूमीपूजन करून थांबलो नाही, तर मंदिर बांधून दाखवले. जम्मू-काश्मीरमधील 370 कलम हटवल्यानंतर सर्व विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली. 370 कलम पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने आणला असला तरी राहुल गांधींची चौथी पिढीसुद्धा 370 कलम पुन्हा लागू करू शकणार नाही, असा सज्जड इशाराच शाहांनी  (Amit Shah)   दिला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.