Maharashtra Assembly Poll : सांगलीत अलिबाग पॅटर्न!

61
Maharashtra Assembly Poll : सांगलीत अलिबाग पॅटर्न!
  • खास प्रतिनिधी 

विधानसभा निवडणुकीत नावातील साधर्म्य साधत विरोधी पक्षाच्या मतांची विभागणी करून आपला उमेदवार निवडून आणण्याचा ‘अलिबाग पॅटर्न’ या निवडणुकीत सांगलीमध्ये दिसून येत आहे. (Maharashtra Assembly Poll)

वसंतदादा कुटुंबातील सदस्य

अलिबागमध्ये फार पूर्वीपासून एकाच नावाचे ३-५ उमेदवार निवडणूक रिंगणात अनेक वर्षांपासून दिसून येत आहेत. त्यात प्रामुख्याने मिनाक्षी पाटील या नावाचा समावेश प्रत्येक निवडणुकीत होत असे. या विधानसभा निवडणुकीत सांगली विधानसभा मतदारसंघात हा ‘अलिबाग पॅटर्न’ पाहायला मिळत आहे. या मतदारसंघात तीन जयश्री पाटील निवडणूक रिंगणात असून तीनही महिलांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे त्यात एक जयश्री पाटील या राज्याचे पहिले मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या कुटुंबातील सदस्य असून काँग्रेसने त्यांना तिकीट नाकारल्याने जयश्री यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. (Maharashtra Assembly Poll)

(हेही वाचा – महायुतीची प्रतिमा मलिन करणार्‍या आठ पदाधिकाऱ्यांचे निलंबन; Sunil Tatkare यांची घोषणा)

लाभ कुणाला?

सांगली मतदारसंघात एकूण १४ उमेदवारांमध्ये लढत होत असून यात महायुतीकडून भाजपाचे धनंजय गाडगीळ हे उमेदवार असून काँग्रेसकडून पृथ्वीराज पाटील आणि अन्य तीन अपक्ष जयश्री पाटील आहेत. यात सांगलीचे विद्यमान खासदार विशाल पाटील यांच्या चुलत वाहिनी जयश्री मदन पाटील यांच्यासह जयश्री जगन्नाथ पाटील आणि जयश्री अशोक पाटील या अन्य दोन अपक्ष उमेदवार आहेत. या तीन अपक्ष जयश्री पाटील यांच्यामुळे काँग्रेसच्या मतांमध्ये विभागणी होण्याची शक्यता असून त्याचा लाभ महायुतीचे उमेदवार गाडगीळ यांना झाला तर आश्चर्य वाटू नये. (Maharashtra Assembly Poll)

४,१३६ उमेदवार निवडणूक रिंगणात

राज्यात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार असून १० हजारांहून अधिक जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते, त्यात ६,९५९ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज छाननीनंतर योग्य असल्याचे आढळून आले तर काही बाद आणि काहींनी माघार घेतल्यानंतर ४,१३६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. २० नोव्हेंबर २०२४ या दिवशी मतदान होणार आहे. (Maharashtra Assembly Poll)

(हेही वाचा – Naxalite यांचे अराजकता एकमेव ध्येय; कोणतेही राजकीय उद्दिष्ट नाही)

तीन खडसे-तीन पाटील

जळगाव जिल्ह्यातील एकनाथ खडसे यांची एकेकाळी पकड असलेल्या मुक्ताईनगर जागेवर नावात साधर्म्य असलेले एकापेक्षा जास्त उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. शिवसेनेकडून (शिंदे) चंद्रकांत पाटील तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटांकडून रोहिणी एकनाथ खडसे अशी प्रमुख लढत होईल. मात्र एक ट्विस्ट असा आहे की या मतदारसंघात एकूण तीन रोहिणी खडसे विरुद्ध तीन चंद्रकांत पाटीलही आहेत. रोहिणी एकनाथ खडसे यांच्याव्यतिरिक्त, रोहिणी पंडित खडसे आणि रोहिणी गोकुळ खडसे याही निवडाडणुक रिंगणात आहेत. या दोन महिला स्थानिकही नाहीत. एक वाशिम जिल्ह्यातील तर दुसरी महिला अकोल्याची आहे. शिवसेनेच्या चंद्रकांत पाटील यांच्याशिवाय अन्य २ उमेदवारही येथून नशीब आजमावत आहेत. (Maharashtra Assembly Poll)

तीन रोहित पवार

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड जागेवर भाजपाने माजी मंत्री राम शिंदे उमेदवारी दिली आहे, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून विद्यमान आमदार रोहित पवार रिंगणात आहेत. रोहित हे शरद पवार यांचे नातू आहेत. या राजकीय पक्षांशिवाय अन्य दोन राम शिंदे आणि एक रोहित पवार अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. (Maharashtra Assembly Poll)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.