Assembly Election च्या पार्श्वभूमीवर पूर्व उपनगरातून ५३ गुंडांना करण्यात आले तडीपार

99
Assembly Election च्या पार्श्वभूमीवर पूर्व उपनगरातून ५३ गुंडांना करण्यात आले तडीपार
  • प्रतिनिधी 

विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर पूर्व उपनगरातील ५३ गुंडावर मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातून तडीपाराची कारवाई करण्यात आली आहे. तडीपार करण्यात आलेले गुंड हे चेंबूर, गोवंडी, मानखुर्द आणि कुर्ला परिसरात राहणारे असून त्याच्यांवर संबंधित पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. मुंबईतील पूर्व उपनगरातील चेंबूर, नेहरू नगर, टिळक नगर, गोवंडी, शिवाजी नगर, देवनार, आरसीएफ, मानखुर्द आणि चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली असून परिमंडळ ६ चे पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलीस ठाण्याकडून या अभिलेखावरील गुन्हेगारांना मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

(हेही वाचा – Naxalite यांचे अराजकता एकमेव ध्येय; कोणतेही राजकीय उद्दिष्ट नाही)

पूर्व उपनगरात अणुशक्ती नगर विधानसभा, मानखुर्द-शिवाजी नगर विधानसभा तसेच कुर्ला विधानसभा हे अतिशय संवेदनशील मतदारसंघ आहे. त्यातील मानखुर्द-शिवाजी नगर हा मतदारसंघ सर्वाधिक संवेदनशील असून मानखुर्द-शिवाजी नगर मतदारसंघातून समाजवादी पार्टीचे उमेदवार अबू आजमी तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे उमेदरवार नवाब मलिक यांच्यात कांटे की टक्कर होणार आहे. नवाब मलिक यांनी अमली पदार्थाला मुद्दा बनवला असून मानखुर्द-शिवाजी नगर अमली पदार्थ मुक्त करण्याची घोषणाबाजी करून निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली, दरम्यान मलिक यांनी समाजवादी पार्टीच्या कार्यालयात सुरू असलेल्या ड्रग्स पार्टीचा फोटो ‘एक्स’ हँडल वर पोस्ट करून आणखीनच खळबळ उडवून दिली होती. (Assembly Election)

(हेही वाचा – राहुल गांधी खोटे बोलणारी फॅक्टरी; Amit Shah यांचा हल्लाबोल)

या व्हिडीओवरून मानखुर्द शिवाजी नगर येथील वातावरण तापले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मुंबई शहरासह पूर्व उपनगरात गुन्हेगार, बेकायदेशीर धंदे, अमली पदार्थ विक्रीवर प्रतिबंधक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पूर्व उपनगरातील परिमंडळ ६ चे पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली मानखुर्द, शिवाजी नगर, चेंबूर, टिळक नगर ट्रॉम्बे, नेहरू नगर इत्यादी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगाराची यादी तयार करून आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत परिमंडळ ६ च्या हद्दीतून ५३ गुन्हेगारांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायदा कलम ५७ अन्वये कारवाई करून या सर्व गुन्हेगारांना मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्याबाहेर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. (Assembly Election)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.