Dhule Ganja Farm : धुळ्यात २ एकरमध्ये गांजाची शेती मुंबई पोलिसांकडून उद्ध्वस्त; एकाला अटक

108
Dhule Ganja Farm : धुळ्यात २ एकरमध्ये गांजाची शेती मुंबई पोलिसांकडून उद्ध्वस्त; एकाला अटक
  • प्रतिनिधी 

धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील एका खेड्यात २ एकर जमीनीवर गांजाची शेती पिकवली जात असल्याची धक्कादायक बाब मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईतून समोर आले आहे. या कारवाईत मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाने धुळ्यातील शिरपूर तालुक्यातून ५ कोटी ६६ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला असून एकाला अटक करण्यात आली आहे. (Dhule Ganja Farm)

(हेही वाचा – Assembly Election च्या पार्श्वभूमीवर पूर्व उपनगरातून ५३ गुंडांना करण्यात आले तडीपार)

मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथक वांद्रे युनिटने काही दिवसांपूर्वी साकिनाका येथून एकाला ४७ किलो गांजासह अटक केली होती. सदर व्यक्ती हा गांजाची विक्री करण्यासाठी साकिनाका परिसरात आली असताना त्याला अटक करण्यात आली होती. त्याची कसून चौकशी करण्यात आली असता, सदर इसम हा धुळे जिल्ह्यातील शीरपूर तालुक्यातील एका खेड्यात राहणारा आहे. किरण कोळी नावाच्या शेतकऱ्याने त्याच्या दोन एकर शेतात गांजाची लागवड केली आहे, व त्याच्याकडून गांजा घेतला असल्याची माहिती पोलिसांना चौकशीत समोर आली. (Dhule Ganja Farm)

(हेही वाचा – Shikhar Bank घोटाळ्यात गैरव्यवहार झालाच नसल्याचा पोलिसांचा दावा कायम; नव्याने न्यायालयात केला अर्ज)

अमली पदार्थ विरोधी पथकाने धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका भोईटी शिवार येथे छापा टाकला असता, त्या ठिकाणी शेतीची पाहणी केली असता किरण कोळी या शेतकऱ्याने दोन एकरात गांजाची लागवड केल्याचे समोर आले. पोलिसांनी शेतातील हा गांजा मजूर लावून काढण्यात आला असून पोलिसांनी जवळपास २ हजार ८१६ किलो सुकलेला आणि ओला गांजा जप्त करण्यात आला आहे, जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत ५ कोटी ६६ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला असून एकाला अटक करण्यात आली आहे. (Dhule Ganja Farm)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.