जानेवारीत BJP ला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष, दिल्लीत २२ नोव्हेंबरला महत्त्वपूर्ण बैठक

86
जानेवारीत BJP ला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष, दिल्लीत २२ नोव्हेंबरला महत्त्वपूर्ण बैठक
जानेवारीत BJP ला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष, दिल्लीत २२ नोव्हेंबरला महत्त्वपूर्ण बैठक

महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुक संपताच भाजपाच्या (BJP) नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची निवड होणार आहे. या संदर्भात भाजपाने दि. २२ नोव्हेंबरला दिल्लीत बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत भाजपाचे सर्व राष्ट्रीय पदाधिकारी आणि सर्व प्रदेशाध्यक्ष यांच्यासह १२५ प्रमुख नेत्यांची संघटनेच्या निवडणुक प्रक्रियेबाबत कार्यशाळा होणार आहे. ही बैठक जे.पी. नड्डा (J. P. Nadda) यांनी बोलावली असून गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) ही यावेळी उपस्थित राहतील. दरम्यान भाजपाच्या नवीन अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंच पूर्ण होईल. ज्यामुळे १५ जानेवारीनंतर पक्षाला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळू शकेल. (BJP)

(हेही वाचा : “सरन्यायाधीश निवृत्त, त्यामुळे जनतेच्या…”, शिवसेना पक्षाबद्दल बोलताना Uddhav thackeray नेमकं काय म्हणाले?

या बैठकीला संघटनेचे राष्ट्रीय निवडणूक अधिकारी के लक्ष्मण आणि संघटनेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नियुक्त केलेले तीन सह- निवडणुक अधिकारी आणि राज्यांमध्ये नियुक्त केलेले राज्य निवडणूक अधिकारी, सह- अधिकारी ही उपस्थित राहतील. दरम्यान निवडणुकीसाठी भाजपा संघटनेचे केंद्रीय निवडणूक अधिकारी के लक्ष्मण यांनी राष्ट्रीय अपील समितीची स्थापना केली आहे. भाजपाच्या (BJP) अध्यक्षपदाच्या निवडणूकीत गैरप्रकार होऊ नये यासाठी ही अपील समिती काम करणार आहे. तसेच दि. ५ नोव्हेंबरला भाजपाचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा (J. P. Nadda) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी कॅबिनेट मंत्र्यांची बैठक बोलवून राज्यवार संघटनात्मक निवडणूकांचा प्रगती अहवाल घेतला. त्याचबरोबर निवडणूकीची प्रक्रिया गतिमान करण्याची योजना आखली. (BJP)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.