शिवसेना उबाठा पक्षातून माजी खासदार Subhash Wankhede यांची हकालपट्टी

156
शिवसेना उबाठा पक्षातून माजी खासदार Subhash Wankhede यांची हकालपट्टी
शिवसेना उबाठा पक्षातून माजी खासदार Subhash Wankhede यांची हकालपट्टी

शिवसेना (उबाठा) पक्षातील हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे (Subhash Wankhede) यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. यासंदर्भात दि. ८ नोव्हेंबरला शिवसेना (उबाठा) पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून हकालपट्टीचे पत्र जारी करण्यात आले. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. या पत्राच्या शेवटी शिवसेना (उबाठा) पक्षाचे सचिव विनायक राऊत (Vinayak Raut) यांची सही आहे.

( हेही वाचा : “विदर्भातील ओबीसी समाजाच्या संतापाची लाट; Congress च्या संमेलनावर बहिष्कार”

दरम्यान सुभाष वानखेडे हदगाव विधानसभेसाठी शिवसेना (उबाठा) कडून इच्छुक होते. मात्र महाविकास आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला गेला. त्यामुळे सुभाष वानखेडे (Subhash Wankhede) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर दि. ३ नोव्हेंबरला माजी खासदार सुभाष वानखेडे (Subhash Wankhede) यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. हदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी मनोज जरांगे पाटलांकडे समर्थन मागितलं होते. मात्र दि. ४ नोव्हेंबरला पक्षाच्या आदेशानुसार उमेदवारी अर्ज मागे घेतला. तरीही त्यांच्यावर राऊतांकडून शिवसेना (उबाठा) तर्फे कारवाई करण्यात आली आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.