Virat Kohli : असा केला साजरा विराट कोहलीने आपला ३६ वा वाढदिवस

Virat Kohli : विराटने नुकताच आपला ३६ वा वाढदिवस साजरा केला आहे 

90
Virat Kohli : असा केला साजरा विराट कोहलीने आपला ३६ वा वाढदिवस
Virat Kohli : असा केला साजरा विराट कोहलीने आपला ३६ वा वाढदिवस
  • ऋजुता लुकतुके

तीनच दिवसांपूर्वी विराट कोहलीने आपला ३६ वा वाढदिवस साजरा केला आहे. आणि यंदा अनेक वर्षांनंतर वाढदिवस फक्त कुटुंबीयांबरोबर साजरा केला असं विराट कोहलीने एका कार्यक्रमात लाजत लाजत सांगितलं. ‘अनुष्का आणि आमची दोन मुलं, एवढेच आम्ही घरी होतो. आम्ही एकमेकांबरोबर हा दिवस साजरा केला. इतक्या वर्षांत पहिल्यांदा असं झालं की, साधेपणाने माझा वाढदिवस साजरा झाला,’ असं विराटने एका कार्यक्रमात गौरव कपूरशी बोलताना सांगितलं. पुढे तो म्हणाला, ‘खरंतर वाढदिवस माझ्या मुलीसाठी होता. तुम्हाला मुलं झाली की, तसंच होतं. कुठलाही दिवस हा मुलांसाठीच असतो.’ (Virat Kohli)

(हेही वाचा- शिवसेना उबाठा पक्षातून माजी खासदार Subhash Wankhede यांची हकालपट्टी)

एका खाजगी मुलाखतीच्या कार्यक्रमात विराट कोहलीने (Virat Kohli) सभागृहात प्रवेश केला. तेव्हा गौरव कपूरने लोकांना विराट कोहलीला शुभेच्छा देण्याचं आवाहन केलं. आणि सभागृहात ‘हॅपी बर्थडे विराट,’ असा गजर झाला. तेव्हा विराटने दिलेली प्रतिक्रिया मजेशीर होती. विराटला हे अनपेक्षित होतं, आणि तो चक्क लाजला. आणि काही क्षणांत सावरल्यावर त्याने मान झुकवून या शुभेच्छांचा स्वीकार केला.

विराट कोहलीची (Virat Kohli) ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. पुढे विराट गंमतीने म्हणाला की, ‘वाढदिवशी मी जास्त प्रगल्भ झालो की नाही मला माहीत नाही. पण, वयाने मोठा झालोय,’ असं विराट म्हणाला. विराट कोहली सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची तयारी करत आहे. २२ नोव्हेंबर पासून पर्थ इथं पहिली कसोटी सुरू होणार आहे. आणि विराट कोहलीवर फॉर्म परत मिळवण्याची जबाबदारी आहे. क्रिकेटच्या मैदानावर अलीकडच्या दोन मालिकांमध्ये विराटची कामगिरी लौकिकाला साजेशी झालेली नाही.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.