K. L. Rahul : ऑस्ट्रेलियन ए संघाविरुद्ध के. एल. राहुल विचित्र पद्धतीने बाद झाला ‘तो’ क्षण

K. L. Rahul : या सामन्यात राहुल दुसऱ्या डावातही १० धावांवरच बाद झाला

166
K. L. Rahul : ऑस्ट्रेलियन ए संघाविरुद्ध के. एल. राहुल विचित्र पद्धतीने बाद झाला 'तो' क्षण
K. L. Rahul : ऑस्ट्रेलियन ए संघाविरुद्ध के. एल. राहुल विचित्र पद्धतीने बाद झाला 'तो' क्षण
  • ऋजुता लुकतुके

जेव्हा तुमचा फॉर्म साथ देत नसतो, तेव्हा तुमच्याकडून किती विचित्र चुका होऊ शकतात हे के. एल. राहुलच्या बाद होण्यातून शुक्रवारी दिसलं. फॉर्म हरवल्यामुळे ऑस्ट्रेलियात खेळण्याचा अनुभव मिळावा यासाठी राहुल आणि ध्रुव जुरेलला ऑस्ट्रेलियात पाठवण्यात आलं. पण, पहिल्या कसोटीत दोन्ही डावांत राहुल ४ आणि १० धावा करून बाद झाला. दुसऱ्या डावांत ४३ चेंडू खेळूनही के. एल. राहुल अगदी विचित्र पद्धतीने बाद झाला. (K. L. Rahul)

(हेही वाचा- Sharad Pawar यांच्या कार्यकाळात १०१ साखर कारखाने मृत्यूपंथाला; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची टीका)

फिरकीपटू कोरे रोचीसिओलीने चेंडूला थोडी उंची दिली. लेग स्टंपवर पडलेला चेंडू सोडून देण्याच्या विचाराने राहुल आणि बाजूला सरकला. पण, चेंडू अचानक वळला. तो मिडल स्टंपच्या दिशेनं यायला लागला. त्यामुळे राहुलने पॅड मधे घालून तो परतवण्याचा प्रयत्न केला. नेमका चेंडू पॅडला लागून पुन्हा स्टंपच्या दिशेनं गेला. तो त्रिफळाचित झाला. खेळपट्टीवर चांगला तासभर घालवल्यानंतरही राहुलला चेंडू समजलाच नाही. आणि त्यामुळे आश्चर्य व्यक्त होतंय. (K. L. Rahul)

 क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही हा बळी ट्विट करताना, ‘राहुल नेमका काय विचार करत होता, कोण जाणे,’ असा मथळा दिला आहे. तर राहुलचा हा बळी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यावर प्रतिक्रियाही उमटत आहेत. (K. L. Rahul)

मायदेशात बांगलादेश आणि न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकांमध्ये के. एल. राहुल संधी मिळूनही फ्लॉप ठरला. त्यामुळे बीसीसीआयने राहुल आणि ध्रुव जुरेलला ऑस्ट्रेलियात लवकर पाठवून ए संघाविरुद्ध सरावाची संधी दिली होती. ध्रुव जुरेलने ही संधी दोन्ही हातांनी उचलली. पहिल्या डावात ८० धावा केल्या. उलट के एल राहुल दोन्ही डावांत स्वस्तात बाद झाला. राहुलला सलामीला खेळवण्याची चाल अयशस्वी ठरली. (K. L. Rahul)

(हेही वाचा- शिवसेना उबाठा पक्षातून माजी खासदार Subhash Wankhede यांची हकालपट्टी)

भारतीय ए संघही त्यामुळे या कसोटीत अडचणीत सापडला आहे. पहिल्या डावांत भारतीय संघ १६१ धावांत बाद झाला. आणि ऑस्ट्रेलिया ए संघाने २२३ धावा केल्यानंतर दुसऱ्या डावातही संघाची ५ बाद ७३ अशी दुरवस्था झाली आहे. (K. L. Rahul)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.