Neeraj Chopra : नीरज चोप्रा सरावासाठी दक्षिण आफ्रिकेला रवाना

Neeraj Chopra : डायमंड्स लीगनंतर नीरज चोप्राने आपला दुसऱ्या हंगामासाठीचा सराव सुरू केला आहे. 

48
Neeraj Chopra : नीरज चोप्रा सरावासाठी दक्षिण आफ्रिकेला रवाना
  • ऋजुता लुकतुके

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी आपला सराव सुरू केला आहे आणि त्यासाठी तो लवकरच दक्षिण आफ्रिकेत पोटशेफ्सट्रूम इथं रवाना होणार आहे. ३१ दिवसांच्या प्रशिक्षणाचा खर्च क्रीडा मंत्रालयाकडून केला जाणार आहे. २६ वर्षीय नीरजने अलीकडेच डायमंड्स लीग अंतिम फेरीत रौप्य पदक जिंकलं आहे. तर पॅरिस ऑलिम्पिकमध्येही त्याने रौप्य आपल्या नावावर केलं.

टोकयो आणि पॅरिस ऑलिम्पिकपूर्वीही नीरजने (Neeraj Chopra) दक्षिण आफ्रिकेतच सराव केला होता. पॅरिस ऑलिम्पिक आणि नंतरच्या डायमंड लीग स्पर्धांमध्येही नीरज चोप्रा कमरेच्या स्नायूच्या दुखापतीने त्रस्त होता. शिवाय त्याचा जांघेचा स्नायूही दुखावला होता. आणि डायमंड्स लीगच्या अंतिम फेरीनंतर त्याने दुखापतीवर उपचार घेण्याचा मानस बोलून दाखवला होता.

(हेही वाचा – K. L. Rahul : ऑस्ट्रेलियन ए संघाविरुद्ध के. एल. राहुल विचित्र पद्धतीने बाद झाला ‘तो’ क्षण)

पण, अलीकडेच नीरजने (Neeraj Chopra) पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत तो पुढील काही स्पर्धा खेळणार असल्याचं म्हणाला होता. ‘हे वर्ष दुखापतींनी भरलेलं गेलं. पण, आता मी बरा आहे. दुखापतही बरी होतेय आणि पुढील हंगामापूर्वी मी १०० टक्के तंदुरुस्त होईन,’ असा आशावाद नीरज चोप्राने बोलून दाखवला होता.

नीरज चोप्राबरोबर गेली ५ वर्षं असलेले त्याचे जर्मन प्रशिक्षक क्लाऊस बार्टिनेझ यांनी वाढत्या वयामुळे मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ते सध्या नीरजबरोबर (Neeraj Chopra) नाहीत. आणि तो भारताचे राष्ट्रीय ॲथलेटिक्स प्रशिक्षक राधाकृष्णन नायर यांच्या देखरेखीखाली साई केंद्रातच सराव करत आहे. पण, या वर्षाच्या शेवटी नीरजसाठी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांची नियुक्ती होईल असं नायर यांनी स्पष्ट केलं आहे.

(हेही वाचा – Accident News: Mumbai-Pune Expressway वर भीषण अपघात! खासगी बसची ट्रकला धडक, ३८ प्रवासी…)

नीरज चोप्राने (Neeraj Chopra) पुढील हंगामात ९० मीटरच्या वर भालाफेक करण्याचं उद्दिष्टं ठेवलं आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्याने ८९.४५ मीटरच्या भालाफेकीसह रौप्य जिंकलं होतं. तर पाकच्या अर्शद नदीमने ९२.९३ मीटरसह सुवर्ण आपल्या नावावर केलं. नीरजने यापूर्वी ८९.९४ मीटरची भालाफेक केली आहे. पण, ९० मीटरने त्याला आतापर्यंत हुलकावणी दिली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.