Maharashtra Vidhansabha Election 2024: पालघरमध्ये कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त, पोलिसांची मोठी कारवाई

86
Maharashtra Vidhansabha Election 2024: पालघरमध्ये कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त, पोलिसांची मोठी कारवाई
Maharashtra Vidhansabha Election 2024: पालघरमध्ये कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त, पोलिसांची मोठी कारवाई

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhansabha Election 2024) पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेदरम्यान छापे टाकून निवडणूक आयोगाच्या (Election Commission) पथकाने आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मुंबई (Mumbai), पुणे, सोलापूर असो की मराठवाडा, सर्वत्र कोट्यवधींचा पैसा जप्त करण्यात आला आहे. शुक्रवारी (8 नोव्हेंबर) मुंबई आणि पालघरमध्ये (Palghar) मोठी रक्कम जप्त करण्यात आली आहे. आजही पालघरमधून सुमारे चार कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पालघरच्या वाड्यातून तीन कोटी सत्तर लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. वाड्याकडून विक्रमगडकडे जाणारे संशयास्पद वाहन पोलिसांनी ताब्यात घेऊन तपासणी केली. त्या वाहनात कोट्यवधींची रोकड असल्याचे आढळून आले. हे वाहन नवी मुंबईतील ऐरोली येथून रोख रक्कम घेऊन वाडा, जव्हार, मोखाडा येथे जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Maharashtra Vidhansabha Election 2024)

नाकाबंदीत पोलिसांची मोठी कारवाई
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे दिवस जवळ येत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून पालघर जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. पालघरच्या वाडा येथील वाडा पाली रस्त्यावर नाकाबंदी करून तपास करत असलेल्या वाडा पोलिसांना विक्रमगडकडे जाणारी एक संशयास्पद कार दिसली. वाडा पोलिसांनी कसून चौकशी केली असता कारमध्ये तीन कोटी सत्तर लाख रुपयांची रक्कम असल्याचे निष्पन्न झाले. ही कार रोख रक्कम घेऊन नवी मुंबईहून वाड्याजवळील मोखाड्याकडे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. गाडीत पैसे कोणाचे होते आणि कुठे जात होते? वाडा पोलीस सध्या त्याचा तपास करत आहेत. (Maharashtra Vidhansabha Election 2024)

निवडणुकीत पैशांचा पाऊस
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पैशांचा पाऊस पडत असल्याचे चित्र असून याआधीही तलासरी पोलिसांनी महाराष्ट्र-गुजरात सीमेवर 4 कोटी 25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता. विरार आणि नालासोपारा येथे नाकाबंदी आणि तपासणीदरम्यान 6 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. (Maharashtra Vidhansabha Election 2024)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.