सोची येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (vladimir putin) यांनी भारत – रशियाच्या (India – Russia) मैत्रीपूर्ण संबंधांवर भाष्य केलं. तर कुठल्याही देशापेक्षा भारताची अर्थव्यवस्था जलद गतीने वाढत असून, जागतिक महासत्तांच्या यादीमध्ये समावेश करण्यास भारत पात्र आहे. असे व्लादिमीर पुतिन (vladimir putin) म्हणाले आहेत. दोन आठवड्यांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) रशियाच्या दौऱ्यावर गेले होते. रशियातील कझान शहरात पार पडलेल्या १६ व्या ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेत ते सहभागी झाले होते. त्यावेळी व्लादिमीर पुतिन यांनी रशिया आणि भारत या दोन्ही देशातील घनिष्ठ संबंधांबाबत भाष्य केलं होतं.
(हेही वाचा-“राज ठाकरेंवर ईडीची टांगती तलवार म्हणुन…”, Sanjay Raut यांचं प्रत्त्युत्तर!)
सोची येथे वल्दाई डिस्कशन क्लबला संबोधित करताना पुतिन (vladimir putin) म्हणाले, “रशिया भारताशी सर्व बाजूंनी संबंध दृढ करीत आहे आणि दोन्ही देशांमध्ये कमालीचा विश्वास आहे. जगात भारताची लोकसंख्या सर्वाधिक आहे. त्यात दर वर्षी एक कोटींनी वाढ होत आहे. अब्जाहून अधिक लोकसंख्या आणि वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, प्राचीन संस्कृती आणि आश्वासक भविष्य पाहता महासत्तांच्या यादीत भारताचा समावेश निःसंशय व्हायला हवा.”
(हेही वाचा-Maharashtra Vidhansabha Election 2024: पालघरमध्ये कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त, पोलिसांची मोठी कारवाई)
“भारत हा गेल्या अनेक दशकांपासून आमचा मित्र आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमधला भागिदार राहिला आहे. या महान देशाशी आपले अनेक दशकांपासून उत्तम संबंध आहेत. मॉस्को व नवी दिल्ली विविध क्षेत्रांमध्ये भागिदार आहेत आणि ही भागिदारी दिवसेंदिवस वाढवत आहोत. भारताचा जीडीपी ७.४ टक्क्यांनी वाढतोय. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आमचं सहकार्य वाढत आहे. भारताच्या स्वातंत्र्यालढ्यापासून उभय देशांमध्ये गुणवत्ता, विश्वास व सहकार्यामुळे अद्वितीय संबंध निर्माण झाले. या दोन देशांमधील द्विपक्षीय व्यापार हा तब्बल ६० अब्ज डॉलर्सचा आहे.” असं व्लादिमीर पुतिन (vladimir putin) म्हणाले आहेत.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community