Donald Trump यांच्या हत्येचा कट इराणने रचलेला; फरहाद शकरीसह तिघांवर आरोप निश्चित

85
Donald Trump यांच्या हत्येचा कट इराणने रचलेला; फरहाद शकरीसह तिघांवर आरोप निश्चित
Donald Trump यांच्या हत्येचा कट इराणने रचलेला; फरहाद शकरीसह तिघांवर आरोप निश्चित

इराणने अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या हत्येचा कट रचल्याचं उघड झालं आहे. मॅनहॅटनच्या फेडरल कोर्टात दाखल करण्यात आलेल्या फौजदारी तक्रारीनुसार ही माहिती समोर आली आहे. अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी (America Presidential election) ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न अयशस्वी झाला होता. या प्रकरणी 3 जणांवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. इराणी अधिकाऱ्यांनी सप्टेंबरमध्ये ट्रम्प यांच्या हत्येसाठी 51 वर्षीय फरहाद शकेरी (Farhad Shakri) यांना जबाबदार धरले होते. शकेरी सध्या फरार असून इराणमध्ये आहे. (Donald Trump) 

मिळलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (US President) म्हणून निवडून आलेले 78 वर्षीय डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्लोरिडामधील पाम बीच येथे असलेल्या ‘मार-ए-लागो’ या घरात सुरक्षेसाठी रोबोटिक कुत्र्यांचा समावेश केला आहे. ‘न्यूयॉर्क पोस्ट’ या स्थानिक मीडिया आउटलेटने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी 8 नोव्हेंबर रोजी डोनाल्ड ट्रम्प यांच्या बागेत ‘रोबोट डॉग’ फिरताना दिसला. हे रोबोट्स बोस्टनच्या एका कंपनीने बनवले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या हत्येतील इराणी कटाचा खुलासा करताना सरकारी वकिलांनी सांगितले की, शकरी यांना इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने अमेरिकेतील अमेरिकन आणि इस्रायली नागरिकांची हत्या करण्याचे काम दिले होते. नंतर इराणने शकरी यांना केवळ ट्रम्पवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. ट्रम्प यांच्या हत्येची योजना आखण्यासाठी त्यांना सात दिवसांचा अवधी देण्यात आला होता.

अफगाण वंशाचा आणि इराणची राजधानी तेहरानमध्ये राहणारा शकेरी त्या वेळेत कोणतीही योजना करू शकला नाही. त्यानंतर त्यांनी IRGC अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपर्यंत मुदत वाढवण्याची प्रतीक्षा करण्याचे आवाहन केले. फरहाद शकरी यांना विश्वास होता की डोनाल्ड ट्रम्प अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हरतील.

(हेही वाचा – Mihir Kotecha यांचे निवडणूक आयुक्तांना पत्र, केली ‘ही’ मागणी)

तक्रारीनुसार, शाकेरीने (Shakeri) एफबीआयला (FBI) सांगितले की, इराणच्या एका अधिकाऱ्याने त्याला सात दिवसांच्या आत हत्येचा कट रचण्यासाठी सुपारी दिली होती. पण त्यावेळी त्याने प्लॅनिंग केले नाही. ट्रम्प यांच्या हत्येचा कट त्यांच्या विजयानंतर काही दिवसांतच उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दोनवेळा जीवघेणा हल्ला झाला आहे.  या हल्ल्यांमध्ये ट्रम्प थोडक्यात बचावले होते.

हेही  पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.