Manufacturing Companies in India : देशातील अव्वल १० उत्पादन क्षेत्रातील कंपन्या कुठल्या?

Manufacturing Companies in India : देशाच्या जीडीपी विकासात उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांचं योगदान मोठं आहे.

55
Manufacturing Companies in India : देशातील अव्वल १० उत्पादन क्षेत्रातील कंपन्या कुठल्या?
  • ऋजुता लुकतुके

उत्पादन क्षेत्रातील कंपन्या देशाचा आर्थिक विकासात पायाभूत काम करत असतात. अवजड उद्योग देशाला उभारी देतात. आणि देशाच्या जीडीपी विकासातही या कंपन्यांचा १० टक्क्यांच्या वर वाटा असतो. या कंपन्यांमधून देशात तंत्र क्रांतीही शक्य झाली आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आज भारताचा दबदबा जगात आहे. पण, उत्पादन क्षेत्रातही भारताने स्वयंपूर्णतेकडे मजल मारली आहे. (Manufacturing Companies in India)

(हेही वाचा – Congress कडून संविधानाची थट्टा; PM Narendra Modi यांचा आरोप)

२०२० पासून देशाच्या उत्पादन कंपन्यांचा विकास दर हा ५.५ टक्क्यांहून जास्त आहे. तर या क्षेत्राने दरवर्षी सरासरी ३९७ अब्ज अमेरिकन डॉलरची भर राष्ट्रीय संपत्तीत घातली आहे. उत्पादन कंपन्यांमध्ये देशाबाहेरून होणारी परकीय गुंतवणूक सरासरी ८७ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतर टाटा आणि बिर्ला हे देशातील दोन प्रमुख उद्योग समुह होते आणि ते अवजड उद्योग तसंच बांधकाम आणि वस्त्रोद्योग तसंच खाणकाम उद्योगात अग्रेसर होते. (Manufacturing Companies in India)

(हेही वाचा – सुनेला टोमणे मारणे, टीव्ही पाहू न देणे क्रूरता नाही; Bombay High Court चा निर्णय)

पण, १९९१ मध्ये पी. व्ही. नरसिंगराव सरकारने भारताची अर्थव्यवस्था खुली केली आणि देशातील कंपन्यांमध्ये ५१ टक्के पर्यंत परकीय गुंतवणुकीला परवानगी दिली. त्यामुळे कंपन्यांची मालकी परदेशी व्यक्ती किंवा संस्थांकडे असू शकणार होती. त्यानंतर भारतीय उद्योग क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलला आहे. भारतात या घडीला ६,८०,००० च्या वर उत्पादन कंपन्या आहेत. कंपनीचा आकार आणि एकूण मालमत्ता यांच्या निकषावर देशातील पहिल्या १० उत्पादन कंपन्या बघूया, (Manufacturing Companies in India)

  • अशोक लेलँड
  • हीरोहोंडा मोटर्स
  • बजाज ऑटो
  • मारुती सुझुकी लिमिटेड
  • महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड
  • लार्सन अँड टुब्रो लिमिटेड
  • गोदरेज ग्रुप
  • डाबर इंडिया लिमिटेड
  • हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड
  • अपोलो टायर्स

(टीप – टाटा समुहातील कंपन्यांवर टाटा सोशल ट्रस्टची मालकी आहे. त्यामुळे या कंपन्या खाजगी मालकीच्या नसल्यामुळे त्या किंवा टाटा सन्स ही मुख्य कंपनीही या यादीत धरलेली नाही)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.