Trident Hotel Nariman Point Mumbai : मरिन ड्राईव्हवर दिमाखात उभं असलेलं ट्रायडंट हॉटेल कुणाच्या मालकीचं?

Trident Hotel Nariman Point Mumbai : एकेकाळी दक्षिण आशियातील ही सर्वात उंच इमारत होती. 

61
Trident Hotel Nariman Point Mumbai : मरिन ड्राईव्हवर दिमाखात उभं असलेलं ट्रायडंट हॉटेल कुणाच्या मालकीचं?
  • ऋजुता लुकतुके

मरिन ड्राईव्‌हवरील क्वीन्स नेकलेसवर अरबी समुद्राला साक्षी ठेवून एक वास्तू दिमाखात उभी आहे. तिचं नाव नरिमन पॉइंट्सचं ट्रायडंट हॉटेल. १९७२ साली ही वास्तू बांधून तयार झाली तेव्हा ती दक्षिण आशियातील सगळ्यात उंच इमारत होती. ३५ मजल्यांची आणि ३४४ फूट उंच ही इमारत आहे ट्रायडंट हॉटेलची. पूर्वाश्रमीचं ओबेरॉय हॉटेल. आता ट्रायडंट-शेरेटन समुहातील हे हॉटेल आहे. १९७३ साली मुंबईतील हॉटेल व्यावसायिक मोहन ओबेरॉय यांनी अमेरिकेतील शेरेटन समुहाशी भागिदारीतून ओबेरॉय शेरेटन नावाने हे पंचतारांकित हॉटेल सुरू केलं. शेरेटन कंपनीने या हॉटेलमध्ये ५ लाख अमेरिकन डॉलरची गुंतवणूक केली होती आणि ओबेरॉय हॉटेल कंपनी प्रत्येक रुमसाठी वर्षभरासाठी शेरेटन कंपनीला १५० अमेरिकन डॉलर देत होती. अगदी सुरुवातीपासूनच हॉटेल नफ्यात होतं. आणि १९७८ सालापर्यंत हॉटेलचा नफा २४ लाख रुपयांवर पोहोचला होता. (Trident Hotel Nariman Point Mumbai)

(हेही वाचा – Indian School of Business : इंडियन स्कूल ऑफ बिझिनेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी किती शुल्क भरावे लागते)

१९७८ मध्ये शेरेटन समुहाने आयटीसी कंपनीबरोबर विपणनाचा एक करार केला. आणि त्यानुसार, शेरेटन कंपनीच्या हॉटेलना नवीन आयटीसीची ओळख मिळणार होती. हा करार ओबेरॉय समुहाला पटला नाही. आणि त्यांनी शेरेटनकडे नाराजी व्यक्त केली. तर शेरेटन यांनी त्यांना मिळणारा मोबदला वाढवण्याची मागणी केली. ही मागणी ओबेरॉय समुहाला मान्य नव्हती. त्यामुळेच ओबेरॉय यांनी १९७९ मध्येच शेरेटन कंपनीबरोबरचा करार मोडला आणि हॉटेलचं नामकरण ओबेरॉय टॉवर्स असं करण्यात आलं. यानंतर ओबेरॉय समुहाने २००४ मध्ये हिल्टन समुहाबरोबर विपणन करार केला आणि हॉटेलचं नाव झालं हिल्टन टॉवर्स. पुढे चार वर्षांनी हा करारही मोडला आणि हॉटेलचं नाव झालं ट्रायडंट नरिमन पॉइंट. (Trident Hotel Nariman Point Mumbai)

(हेही वाचा – Donald Trump यांच्या हत्येचा कट इराणने रचलेला; फरहाद शकरीसह तिघांवर आरोप निश्चित)

२६ नोव्हेंबर २००८ मध्ये या हॉटेलवरही दहशतवादी हल्ला झाला होता आणि दोन दहशतवादी अब्दुल रेहमान छोटा आणि अबू फहाद यांनी १४३ लोकांना या हॉटेलमध्ये ओलीस ठेवलं होतं. पण, चार दिवसांनी हा हल्ला परतवून लावण्यात मुंबई पोलिसांना यश आलं. पुढील दीड वर्षं हे हॉटेल बंद होतं. पण, आता ते पुन्हा सुरू झालं आहे. ईस्ट इंडिया हॉटेल्स या कंपनीकडे या हॉटेलची मालकी आहे. शापूरजी पालनजी समूहाने या इमारतीचं बांधकाम केलं आहे. ३५ मजल्यांचे दोन टॉवर या जागी आहेत. (Trident Hotel Nariman Point Mumbai)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.