Maharashtra Assembly Election : सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडी मजबूत, महायुती किती गड राखणार?

61
Maharashtra Assembly Election : सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडी मजबूत, महायुती किती गड राखणार?
  • सचिन धानजी, मुंबई

सोलापूर जिल्ह्यात ११ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण ३३५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या जिल्ह्यातील सांगोला, अक्कलकोट, माळशिरस या तीन विधानसभा मतदारसंघात महत्त्वाच्या लढती होणार आहे. सर्वाधिक वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या गणपत देशमुख यांचा पराभव करून विजयी झालेल्या सांगोल्याचे शहाजी बापू पाटील यांच्यासमोर साळुंखे आणि बाबासाहेब देशमुख यांच्यात यांच्यात होणाऱ्या लढतीचा फायदा कुणाला होतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. या जिल्ह्यात शहाजी बापू पाटील, भाजपाचे राम सातपुते, उत्तम जानकर, नरसय्या आडम, दिलीप सोपल आदी मान्यवर निवडणूक रिंगणात उभे आहे. (Maharashtra Assembly Election)

सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट, सोलापूर उत्तर, सोलापूर दक्षिण, सोलापूर मध्य, मोहोळ, बार्शी, माढा, सांगोला, माळशिरस, करमाळा, पंढरपूर मंगळवेढा आदी विधानसभा क्षेत्र मोडत आहे. यातील सोलापूर लोकसभा मतदारसंघात मोहोळ, सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य, अक्कलकोट, सोलापूर दक्षिण आणि पंढरपूर विधानसभा, माढा लोकसभा मतदारसंघात करमाळा, माढा, सांगोला, माळशिरस आणि उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात बार्शी विधानसभा क्षेत्र मोडत आहे. माढा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) धैर्यशिल मोहिते पाटील, सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रणिती शिंदे आणि उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून उबाठा शिवसेनेचे ओमप्रकाश निंबाळकर हे निवडून आले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या तिन्ही लोकसभा मतदारसंघात आणि सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात महाविकास आघाडीचे प्राबल्य दिसून येत आहे. (Maharashtra Assembly Election)

(हेही वाचा – Drugs : मुंबईत सव्वा दोन कोटींचे हेरॉईन जप्त, चौघांना अटक)

माळशिरसमध्ये जानकरांसमोर राम सातपुतेंचे आव्हान

माळशिरस विधानसभेत मागील लोकसभा निवडणुकीत पराजित झालेल्या राम सातपुते हे भाजपाच्या तिकीटावर निवडणूक रिंगणात उभे असून त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे उत्तम जानकर हे पक्षाचे फायरब्रँड नेते उभे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने जानकर यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर या मतदारसंघात भाजपाचा उमेदवार ठरत नसल्याने बहुधा मी बिनविरोध आमदार बनणार असे स्वप्न जानकर यांनी पाहिले होते, परंतु आता त्यांच्यासमोर राम सातपुते यांचे आव्हान असेल. या मतदारसंघातील लढाई ही खऱ्या अर्थाने शरद पवार आणि भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. (Maharashtra Assembly Election)

पंढरपूर-मंगळवेढा अवताडे विरुद्ध भालके

या मतदारसंघात सन २००९ पासून पूर्वी स्वाभिमानी पक्ष आणि त्यानंतर काँग्रेसच्या तिकीटावर भारत भालके निवडून येत होते. परंतु सन २०१९ मध्ये निवडून आलेल्या भारत भालके यांचा निधन झाल्यानंतर २०२१ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाचे समाधान अवताडे हे निवडणुकीत विजयी होत आमदार झाले. त्यामुळे या मतदारसंघात भाजपाचे आमदार समाधान अवताडे, तर काँग्रेसच्या तिकीटावर भगीरथ भालके यांच्यात प्रमुख लढत आहे. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोर अपक्ष अनिल सावंत आणि मनसेचे दिलीप धोत्रे यांचेही आव्हान असल्याने पोटनिवडणुकीतील विजय राखण्यात अवताडे यशस्वी ठरतात की भालके पुन्हा आपला गड राखतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. (Maharashtra Assembly Election)

(हेही वाचा – Donald Trump यांच्या हत्येचा कट इराणने रचलेला; फरहाद शकरीसह तिघांवर आरोप निश्चित)

अक्कलकोट

भाजपा – सचिन कल्याणशेट्टी

काँग्रेस – सिद्धाराम म्हेत्रे

सोलापूर उत्तर

भाजपा – विजयकुमार देशमुख

राष्ट्रवादी (शप) – महेश कोठे

सोलापूर दक्षिण

भाजपा – सुभाष देशमुख

शिवसेना (उबाठा) – अमर पाटील

अपक्ष – धर्मराज काडादी

सोलापूर मध्य

भाजपा – देवेंद्र कोठे

काँग्रेस – चेतन नरोटे (काँग्रेस)

एआयएमआयएम – फारुख शाब्दि

सीपीएम – नरसय्या आडम

सांगोला विधानसभा

शिवसेना (शिंदे) – शहाजी बापू पाटील

शिवसेना (उबाठा) – दीपक आबा साळुंखे

शेकाप – बाबासाहेब देशमुख

मोहोळ विधानसभा

राष्ट्रवादी – यशवंत माने

राष्ट्रवादी (शप) – राजू खरे

अपक्ष – संजय क्षीरसागर

बार्शी

शिवसेना (उबाठा) – दिलीप सोपल

शिवसेना (शिंदे) – राजेंद्र राऊत

माढा

राष्ट्रवादी काँग्रेस (श.प) – अभिजीत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस – मिनल साठे

अपक्ष – रणजीतसिंह शिंदे (अपक्ष)

माळशिरस

राष्ट्रवादी (शप) – उत्तम जानकर

भाजपा – राम सातपुते (भाजपा)

करमाळा

राष्ट्रवादी (शप) – नारायण आबा पाटील

शिवसेना दिग्विजय बागल (शिवसेना)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.