Jodhpur Crime News : जोधपुर हत्याकांडातील मुख्य आरोपीला मुंबई सेंट्रल येथून अटक

93
Jodhpur Crime News : जोधपुर हत्याकांडातील मुख्य आरोपीला मुंबई सेंट्रल येथून अटक
  • प्रतिनिधी

जोधपूरमध्ये झालेल्या एका हत्याकांडातील मुख्य आरोपीला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. जोधपुर पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या मदतीने या हत्याकांडातील आरोपीला मुंबई सेंट्रल येथून अटक करण्यात आली आहे. गुलामुद्दीन फारुकी असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव असून मागील १० दिवसांपासून गुलामुद्दीन हा मुंबईत वेशभूषा बदलून एका हॉटेलात राहत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोधपूरमध्ये राहणारी ५० वर्षीय ब्युटीशियन अनिता चौधरी २७ ऑक्टोबर रोजी बेपत्ता झाली होती. गुलामुद्दीन फारुकीला भेटण्यापूर्वी तिचे ब्युटी पार्लर सोडून ऑटो-रिक्षात बसून दुपारी अडीचच्या सुमारास तिला शेवटचे पाहिले गेले होते. सीसीटीव्ही फुटेजने त्यांच्या भेटीची पुष्टी केली, त्यानंतर ते एकत्र फिरताना दिसले. चौधरी घरी न परतल्याने त्यांचे पती मनमोहन चौधरी यांनी सरदारपुरा पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. (Jodhpur Crime News)

(हेही वाचा – Palghar News : पालघरमध्ये ४ कोटींची रोकड हस्तगत)

पोलिसांकडून अनिता चौधरी हिचा शोध घेण्यात येत असताना ३० ऑक्टोबर रोजी, येथील पोलीस अधिकाऱ्यांना फारुकीच्या निवासस्थानाजवळ पूरलेला अनिताचा छिन्नविच्छिन्न मृतदेह सापडला. अनिता चौधरीला ठार करून तिच्या शरीराचे सहा तुकडे करून तिला पुरण्यात आले होते असे तपासात समोर आले. चौकशीदरम्यान, फारुकीची पत्नी आबिदा हिने उघड केले की, तिच्या पतीने अनिताला अमली पदार्थ पाजून ठार मारले, त्यानंतर कटरचा वापर करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि ते त्यांच्या घराजवळ पुरले. बळीत अनिताचे पती मनमोहन चौधरी यांनी फारुकी आणि आबिदा या दोघांविरुद्ध हत्येची तक्रार दाखल करण्यात आली. तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा संशय व्यक्त करण्यात आला होता. जोधपूर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून फारुकीची पत्नी आबिदाची चौकशी केली तेव्हा तिने त्यांना सांगितले की तिचा पती गुलामुद्दीन याने अनिताला आपल्या घरी बोलावले होते आणि तिला ज्यूसमध्ये गुंगीचे औषध दिले, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. तिची शुद्ध हरपताच हत्या करून तिचे सहा तुकडे करून ते घराच्या अंगणात गाडण्यात आले होते. आबिदाला तिच्या कथित सहभागासाठी अटक करण्यात आली होती, कारण खून झाला तेव्हा ती देखील घरात होती. (Jodhpur Crime News)

(हेही वाचा – Drugs : मुंबईत सव्वा दोन कोटींचे हेरॉईन जप्त, चौघांना अटक)

जोधपुर पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा केलेल्या कारवाईत, मुंबई पोलिसांच्या मदतीने, हत्येतील मुख्य संशयिताला अटक केली. संशयित हा गेल्या १० दिवसांपासून मुंबईत लपून बसला होता आणि अखेर मुंबई सेंट्रल येथील मराठा मंदिर सिनेमा हॉलजवळ त्याचा माग काढण्यात आला, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, फारुकी २९ ऑक्टोबर रोजी जोधपूरहून अहमदाबादला बसने प्रवास करत पळून गेला. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून त्याच्या हालचालींचा मागोवा घेतल्यानंतर त्याने मुंबईला जाण्यासाठी ट्रेन पकडल्याचे पोलिसांना समजले. परिणामी, अतिरिक्त उपायुक्त निशांत भारद्वाज यांच्या नेतृत्वाखालील जोधपुर पोलिसांच्या पथकाने व्हीपी रोड पोलिसांशी समन्वय साधून फारुकीला शोधून त्याला ताब्यात घेतले. त्याने दाढी वाढवली होती, केस कापले होते आणि तो मुंबई सेंट्रल येथील एका लॉजवर राहत होता. नंतर राजस्थान पोलीस त्याचा शोध घेण्यासाठी आमच्याकडे मदतीसाठी आले. गेल्या सहा दिवसांपासून ते शहरातच असल्याने त्यांचा शोध लागला नाही. आम्ही त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली, त्याचा माग काढला आणि त्याला सरदारपुरा पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस अधिकारी म्हणाले की, गुलामुद्दीनला जुगार खेळण्याचे व्यसन असून त्याच्यावर १२ लाख रुपयांचे कर्ज असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. (Jodhpur Crime News)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.