Cash Seized : वाडा-विक्रमगड मार्गावर ३ कोटी ७० लाख रुपये जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

66
Cash Seized : वाडा-विक्रमगड मार्गावर ३ कोटी ७० लाख रुपये जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
Cash Seized : वाडा-विक्रमगड मार्गावर ३ कोटी ७० लाख रुपये जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

वाडा-विक्रमगड मार्गावरील (Wada-Vikramgad) पाली येथे निवडणूक आयोगाच्या (Election Commission) तपासणी पथकाने ३ कोटी ७० लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. आलोंडेहून वाड्याकडे येणाऱ्या पिकअपची तपासणी केली असता, त्यात ३ कोटी ७० लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम आढळली. (Cash Seized)

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election : सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडी मजबूत, महायुती किती गड राखणार?)

पांढऱ्या क्रमांकाची पिकअप आलोंड्यावरून वाड्याकडे येत होती. पथकातील कर्मचाऱ्यांनी गाडीची तपासणी केली. चालक महेंद्र सांडभोर (४५) व त्याच्यासोबत असलेले प्रतीक शिंदे, कल्पेश मिसाळ, सिक्युरिटी गार्ड रणजीत यादव यांच्याकडे गाडीतील रकमेबाबत विचारणा केली असता, हे वाहन सीएमएस कंपनी कार्यालय, ऐरोली, नवी मुंबई यांचे असून, त्यामधील रोख रक्कम ते एटीएम सेंटरमध्ये भरण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगितले. या वाहनाच्या दर्शनी भागावर पुढील बाजूला चालकाचे नाव व कॅश वाहून नेण्याबाबतच्या तपशिलाची माहिती असणारा क्यूआर कोड नव्हता.

गाडीतील व्यक्तींना गाडीमध्ये किती रक्कम आहे, याबाबत निश्चित आकडा सांगता येत नव्हता. त्यामुळे रकमेबाबत संशय आल्याने पोलीस शिपाई मनोज भोये यांनी पोलीस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांना हा प्रकार सांगितला. खात्री करण्यासाठी गाडी वाडा पोलीस ठाण्यात आणून दोन पंचांसमोर व सीएमएस कंपनीचे कर्मचारी प्रतीक शिंदे व कल्पेश मिसाळ यांच्यासमोर खात्री करून पंचनामा केला. त्या वेळी त्या गाडीतील पत्र्याच्या पेटीमध्ये ३ कोटी ७० लाख रुपयांची रोख रक्कम सापडली.

वाडा पोलीस ठाण्यात ती रक्कम ताब्यात घेतली असून, जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या आदेशानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांनी दिली. या कारवाईत स्थिर पथकाचे प्रभाकर सांबर, रवी पाटील, मनोज भोये आदी कर्मचारी सहभागी झाले होते. (Cash Seized)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.