कोणाला पाडायचे, निवडायचे याचे निरोप पोहोचले; Manoj Jarange यांनी स्वतःच दिली कबुली

91
कोणाला पाडायचे, निवडायचे याचे निरोप पोहोचले; Manoj Jarange यांनी स्वतःच दिली कबुली
कोणाला पाडायचे, निवडायचे याचे निरोप पोहोचले; Manoj Jarange यांनी स्वतःच दिली कबुली

स्वतंत्र उमेदवार उभे करण्याची आणि अनेक उमेदवार पाडण्याची घोषणा करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी अचानक यू-टर्न घेत निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी अशी घोषणा केली, तेव्हाच ही माघार नसून खेळी आहे, असे बोलले जात होते. आता त्यांनी त्यासंदर्भात स्वतःच घोषणा केली आहे. समाजाचे नुकसान होऊ नये म्हणून आपण निवडणुकीतून माघार घेतली.

एकट्या समाजाच्या बळावर निवडून येणे अशक्य असते. परंतु आता कोणाला पाडायचे आणि कोणाला निवडायचे हा निरोप त्या-त्या मतदारसंघात पोहोचला आहे, असा दावा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला. एका वर्तमानपत्राला दिलेल्या विशेष मुलाखतीत मनोज जरांगे यांनी ही माहिती दिली.

या मुलाखतीत जरांगे यांनी आंदोलनातून ऐनवेळी माघार का घेतली, हेही सांगितले आहे. मनोज जरांगे म्हणाले की, एका जातीच्या आधारावर निवडणूक जिंकता येत नाही. मराठा उमेदवार पराभूत झाले असते, तर त्याचा फटका आरक्षण आंदोलनाला बसला असता. राजकारण हा माझा प्रांत नाही. मला समाजासाठी लढायचे आहे. त्यांना आरक्षण मिळवून द्यायचे आहे. म्हणून मी हा निर्णय घेतला. तो मी एकट्याने घेतला नाही. मराठा समाजबांधवांशी चर्चा केली. त्यांनाही माझे म्हणणे पटले. नंतर मी हा निर्णय जाहीर केला, असे जरांगे यांनी सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.