“स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात राहुल गांधी दोन शब्द चांगले बोलतील का?”, Amit Shah यांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल

76
"स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात राहुल गांधी दोन शब्द चांगले बोलतील का?", Amit Shah यांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या उपस्थितीत पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित होते. यावेळी अमित शाह (Amit Shah) यांनी बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना थेट आव्हान दिले.

“तुम्हाला कुठे बसायचं हे तुम्हीच ठरवा”

अमित शाह म्हणाले, “स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात राहुल गांधी (Rahul Gandhi) केवळ दोन शब्द चांगले बोलू शकतील का? बाळासाहेब ठाकरे यांच्यासंदर्भात काँग्रेसचा कोणताही नेता दोन चांगले शब्द बोलेल का? उद्धवजी तुम्ही कोणासोबत बसला आहात, जी लोक कलम ३७० ला विरोध करत आहे, जी लोक राम मंदिरास विरोध करतात, जी लोक सावकरसंदर्भात चांगले बोलू शकत नाही. संभाजीनगर नावाला विरोध करणाऱ्यांसोबत तुम्ही बसला आहात. सीएएस, युसीसीला विरोध करणाऱ्यांसोबत बसला आहोत. वक्फ बिलच्या सुधारणेला विरोध करणाऱ्यांसोबत बसला आहात. तुम्हाला कुठे बसायचं हे तुम्हीच ठरवा.” असे अमित शाह म्हणाले.

“शरद पवार तुम्ही दहा वर्ष काय केलं?”

शरद पवारांवर (Sharad Pawar) निशाणा साधताना अमित शाह म्हणाले, “शरद पवार यांना विचारतो दहा वर्ष तुम्ही केंद्रात मंत्री होता. २००४ ते २०१४ पर्यंत महाराष्ट्राच्या विकासासाठी काय केलं ते सांगा. तुमच्या सरकारमध्ये दहा वर्षात महाराष्ट्रावर किती अन्याय झाला ते सांगा. शरद पवार ज्या पद्धतीने आश्वासन देतात, ज्या पद्धतीने मुद्दे उपस्थित करतात त्याचा वास्तवाशी किलोमीटरपर्यंतही संबंध नसतो. खोटे आरोप करून नरेटिव्ह तयार करतात. नकली जनादेश घेण्याचं काम करतात. यावेळी ते होणार नाही. यावेळी महाराष्ट्राची जनता आमच्यासोबत आहे.”

“संकल्पपत्रात महाराष्ट्रातील जनतेच्या आकांक्षेचं प्रतिबिंब”

पुढे बोलताना ते म्हणाले, “महाराष्ट्र अनेक क्षेत्रात देशाचे नेतृत्व करत आहे. महायुती सरकारने महिला, शेतकऱ्यांसाठी काम केले आहे. मजबूत, समृद्ध आणि सुस्कृंत महाराष्ट्रासाठी संकल्पपत्र आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेल्या राज्यघटनेनुसार काश्मीरमध्ये प्रथमच मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. याशिवाय वेगळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काय श्रद्धांजली असू शकते. ज्या संकल्पपत्राचं लोकार्पण झाले ते महाराष्ट्रातील जनतेच्या आकांक्षेचं प्रतिबिंब आहे. महाराष्ट्र अनेक युगापासून देशाचे नेतृत्व करत आहे. भक्ती आंदोलनाची सुरुवात महाराष्ट्रात झाली. जेव्हा गरज पडली तेव्हा गुलामीतून मुक्तीचे आंदोलन शिवाजी महाराजांनी इथूनच सुरू केली. सामाजिक क्रांतीची सुरुवातही महाराष्ट्रातूनच झाली.” असं अमित शाह म्हणाले आहेत.

भाजपच्या संकल्पपत्रातील महत्त्वाच्या घोषणा

  1. लाडकी बहीण योजनेतील महिलांना १५०० रुपयांवरुन २१०० रुपये दिले जाणार
  2. महिलांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण
  3. महिलांच्या सुरक्षेसाठी २५००० महिलांचा पोलीस दलात समावेश केला जाणार
  4. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार
  5. शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला १२ हजार वरुन १५ हजार
  6. प्रत्येक गरीबाला अन्न आणि निवारा देण्यात येणार
  7. वृद्ध पेन्शन धारकांना १५०० वरुन २१०० रुपये दिले जाणार
  8. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवणार
  9. २५ लाख रोजगार निर्मिती
  10. महिन्याला १० लाख विद्यार्थ्यांना १० हजार रुपये विद्यावेतन
  11. ग्रामीण भागात ४५ हजार गावात पांधण रस्ते बांधणार
  12. अंगणवाडी आणि आशा सेविकांचे मानधन वाढ करुन त्यांना दर महिना १५ हजार वेतन आणि विमा संरक्षण देणार
  13. वीज बिलात ३० टक्के कपात करुन सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देणार
  14. सरकार स्थापनेनंतर १०० दिवसांच्या आत व्हिजन महाराष्ट्र @२०२९ सादर केले जाणार
  15. २०२८ पर्यंत महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष्य
  16. मेक इन महाराष्ट्र धोरण राबवणार
  17. महाराष्ट्राला जागतिक फिनटेक आणि कृत्रिम बुद्धीमत्ता (AI) राजधानी बनवणार
  18. पहिल्या विशेष AI विद्यापीठाची स्थापना करणार
  19. नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि नाशिकला आधुनिक एरोनॉटिकल आणि स्पेस उत्पादन केंद्र बनवणार
  20. शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या खतांवरील जीएसटी अनुदानाच्या रुपात परत देणार
  21. शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ६००० भाव मिळावा म्हणून सोयाबीन उत्पादन, प्रक्रिया आणि मूल्यवर्धनासाठी समर्पित संपूर्ण शृंखलेची स्थापन
  22. २०२७ पर्यंत महाराष्ट्रात ५० लक्ष लखपती दीदी तयार करणार प्रत्येकी ५०० स्वयंसहायता गटाचे एक औद्योगिक क्लस्टर तयार करण्यात येईल आणि १००० कोटींचा प्रारंभिक फिरता निधी उपलब्ध करण्यात येणार
  23. अक्षय अन्न योजनेतंर्गत कमी उत्पन्न गटातील कुटुंबांना दरमहा मोफत शिधा देण्यात येणार, यात तांदूळ, ज्वारी, शेंगदाण्याचे तेल, मीठ, साखर, हळद, मोहरी, जिरे आणि लाल मिरची पावडर यांचा समावेश असणार
  24. महारथी अटल टिंकरिंग लॅब्स योजना सुरु करणार
  25. महाराष्ट्रात कौशल्य जनगणना करण्यात येणार
  26. छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र स्थापन करण्यात येणार. यात को वर्किंग स्पेस, इनक्युबेशन सुविधा असतील. यातून १० लाख नवीन उद्योजक तयार केले जाणार
  27. अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय उद्योजकांना व्यवसाय वृद्धीसाठी १५ लाखांपर्यंत व्याजरहित कर्ज देण्यात येणार ओबीसी, एसईबीसी, ईडबल्यूएस, एनटी, व्हीजेएनटीमधील पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती करण्यात येणार
  28. १८ ते ३५ वयोगटातील आरोग्य तपासणीसाठी स्वामी विवेकानंद आरोग्य कार्ड सुरु करण्यात येणार
  29. नशामुक्त-व्यसनमुक्त महाराष्ट्रासाठी कायमस्वरुपी योजना लागू करण्यात येणार
  30. गड-किल्ले विकास प्राधिकरण स्थापन करणार
  31. ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य धोरण स्विकारणार – आधार सक्षम सेवा वितरण लागू करणे, आरोग्य नोंदी, ओळखपत्रे आणि पेन्शन संबंधित कागदपत्रे थेट घरी पोहोचवण्याची व्यवस्था, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र ओपडी
    बळजबरी आणि फसवून केलेल्या धर्मांतराविरुद्ध कठोर कायदा करणार
  32. मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी AI तंत्रज्ञान, ड्रोन आणि रेडिओ कॉलर तंत्रज्ञानाचा वापर

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.