नेपाळचे नवे पंतप्रधान KP Sharma Oli यांना चीनच जवळचा; भारताआधी जाणार चीनच्या दौर्‍यावर

51
नेपाळचे नवे पंतप्रधान KP Sharma Oli यांना चीनच जवळचा; भारताआधी जाणार चीनच्या दौर्‍यावर
नेपाळचे नवे पंतप्रधान KP Sharma Oli यांना चीनच जवळचा; भारताआधी जाणार चीनच्या दौर्‍यावर

नेपाळचे नवे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली (KP Sharma Oli) सत्तेवर आल्यानंतर त्यांच्या पहिल्या परदेश दौर्‍यावर चीनला जात आहेत. चीनचे (China) पंतप्रधान ली कियांग यांनी ओली यांना २ ते ६ डिसेंबर या कालावधीत अधिकृत भेटीसाठी आमंत्रित केले आहे. नेपाळमध्ये अशी परंपरा आहे की, जो कुणी नवा पंतप्रधान होतो, तो प्रथम भारताला भेट देतो. ओली यांनी मात्र ही परंपरा मोडली आहे.

(हेही वाचा – लाडक्या बहिणींना 2100, शेतकरी कर्जमाफी, विशेष AI विद्यापिठाची स्थापना; BJP Manifesto प्रसिद्ध)

के.पी. ओली हे ऑगस्ट २०१५ मध्ये पहिल्यांदा नेपाळचे (Nepal) पंतप्रधान झाले. यानंतर त्यांनी फेब्रुवारी २०१६ मध्ये भारताला भेट दिली. मार्चमध्ये ते चीनला गेले. ओली आतापर्यंत ४ वेळा नेपाळचे पंतप्रधान झाले आहेत. ओली यांनी त्यांच्या मागील कार्यकाळात अनेक भारतविरोधी पावले उचलली होती. त्यांच्या काळातच नेपाळ सरकारने वादग्रस्त नकाशा प्रसिद्ध केला होता.

ओली यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या अधिकाऱ्यांनी याचे स्पष्टीकरण दिले की, ओली यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ४ महिन्यांनंतरही भारताकडून कोणतेही औपचारिक निमंत्रण मिळाले नाही. सहसा नेपाळच्या पंतप्रधानांना पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच भारतातून निमंत्रण मिळते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.