पितृसत्ता ही डाव्यांची संकल्पना; Nirmala Sitharaman यांचा आरोप

57

जर पितृसत्ता भारतातील महिलांना त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यापासून रोखत असेल तर इंदिरा गांधी पंतप्रधान कशा होऊ शकतात? पितृसत्ता ही कल्पना डाव्या पक्षांनी तयार केली होती, असा आरोप केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी केला.

सीएमएस बिझनेस स्कूल, बंगळुरू येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी (Nirmala Sitharaman) माहिती दिली. महिला सक्षमीकरणावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सीतारामन म्हणाल्या की, महिलांनी आकर्षक गुंतागुंतीच्या शब्दांच्या जाळ्यात अडकू नये, असा सल्ला दिला. जर तुम्ही स्वतःसाठी उभे राहून तर्कशुद्धपणे बोललात तर पितृसत्ता तुम्हाला तुमची स्वप्ने साध्य करण्यापासून रोखू शकत नाही. मात्र, महिलांसाठी पुरेशा सुविधा उपलब्ध नसून बदलाची गरज असल्याचे त्यांनी मान्य केले.

(हेही वाचा निवडणुकीआधी Ulema Board चा मविआला पाठिंबा; नाशिकमध्ये बेरोजगार मुस्लिम युवकांच्या खात्यात १२५ कोटी जमा)

मोदी सरकारने नवोदितांसाठी चांगले वातावरण निर्माण केले आहे. या कार्यक्रमात निर्मला यांनी नवनिर्मितीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने उचललेली पावले आणि तरुणांसाठी उपलब्ध असलेल्या सरकारी योजनांविषयी सांगितले. नवोन्मेषाच्या संधींबाबत निर्मला म्हणाल्या की, मोदी सरकार नवनिर्मितीसाठी चांगले वातावरण तयार करत आहे. आमचे सरकार केवळ धोरणे बनवून नवनिर्मितीला पाठिंबा देत नाही. अशा नवनवीन गोष्टींना बाजारपेठ मिळावी याचीही काळजी सरकार घेत आहे. सरकारने एमएसएमईसाठी समर्थन यंत्रणा तयार केली आहे अर्थमंत्र्यांनी सांगितले की, केंद्र सरकारने एमएसएमई (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग) साठी समर्थन यंत्रणा तयार केली आहे. या अंतर्गत, सरकारी खरेदीमध्ये एमएसएमईंना प्राधान्य दिले जाते, असे निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman)  म्हणाल्या.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.