Chhatrapati Shivaji Maharaj : शिवरायांचं मंदिर लोकांच्या मनात उभारायला हवं!

67
Chhatrapati Shivaji Maharaj : शिवरायांचं मंदिर लोकांच्या मनात उभारायला हवं!
Chhatrapati Shivaji Maharaj : शिवरायांचं मंदिर लोकांच्या मनात उभारायला हवं!
  • जयेश शत्रुघ्न मेस्त्री

निवडणूक जवळ आली असल्यामुळे राजकीय पक्षांकडून आश्वासनांची खैरात वाटण्यात येत आहे. कुणी पैसे देण्याचे आश्वासन देत आहे तर कुणी अजून काही. मात्र उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिलेले आश्वासन सध्या चर्चेत आहे. ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर बांधण्याची घोषणा केली आहे. यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) टिका करत म्हणाले की, हिंमत असेल तर मुंब्रा शहरात शिवरायांचं मंदिर बांधून दाखवावं. त्यावर ठाकरेंनी सुरतेतही मंदिर उभारणार असल्याचं म्हटलं. तर ‘सरकारनं जागा आणि परवानगी दिल्यास मंदिर उभारतो आणि उद्घाटनाला फडणवीसांना बोलावतो’ असं वक्तव्य जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) केलं आहे.

मुळात आपल्याकडे अफझलखान वधाचं छायाचित्र झळकल्यावर काही लोकांच्या भावना दुखावल्याच्या घटना घडल्या आहेत. यावर आव्हाड आणि ठाकरेंचं काय म्हणणं आहे? पुरोगामी मंडळी शिवाजी महाराजांचा संदर्भ देताना महाराजांच्या सैन्यात ५७% मुस्लिम होते असा उल्लेख करतात. महाराजांना सेक्युलर दाखवण्याचा प्रयत्न करतात, खरा इतिहास लपवून ठेवतात. मग अशा परिस्थितीत शिवाजी महाराजांचं मंदिर बांधण्याची घोषणा दिल्याने समाजात कोणता बदल होणार आहे? शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जसा आहे तसा लोकांसमोर नको का यायला? महाराजांचं वेगळेपण लोकांना नको का कळायला. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हे वैश्विक गुरु आहेत. तर त्यांचं ते मोठेपण जगाला नको का कळायला?

(हेही वाचा – Jharkhand Assembly Election: PM Narendra Modi यांची सोरेन सरकारवर टीका; म्हणाले, भ्रष्टाचाराचा हिशेब…)

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पिताश्रींनी शिवसेना नावाचा पक्ष स्थापन केला. शिवसेना म्हणजे शिवाजी महाराजांची सेना! महाराजांच्या नावावर ठाकरे कुटुंब यशाच्या शिखरावर पोहोचलं. पक्ष वाढत गेला, आर्थिक परिस्थिती खूप चांगली झाली, कडव्या कार्यकर्त्यांचं म्हणजेच शिवसैनिकांचं जाळं महाराष्ट्रभर पसरलं. मग किती शिवसैनिकांना महाराजांचा इतिहास माहिती आहे? किती शिवसैनिकांना शिवकाळाचा अभ्यास आहे? ठाकरेंनी इतक्या वर्षांत शिवचरित्राचं पारायण ठिकठिकाणी आयोजित केलं का? महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी ठाकरेंकडे काही योजना आहेत का? शिवाजी महाराजांच्या तत्त्वावर महाराष्ट्र चालेल, याविषयी ठाकरेंनी काही धोरण आखलं आहे का? जर या प्रश्नांची उत्तरे ‘नाही’ अशी असतील तर मग या घोषणेला अर्थ काय आहे?

महाराष्ट्रातील प्रत्येक घरात शिवचरित्र पोहोचायला हवं. तरुणांचं प्रबोधन करायला हवं की केवळ महाराजांसारखी दाढी ठेवल्याने कुणी सद्गुणी होणार नाही. तर त्यासाठी महाराजांच्या तत्त्वांवर मार्गक्रमण करायला हवा. शिवाजी महाराजांच्या मार्गावरुन चालणं हे सोपं काम नाही. ठिकठिकाणी अनेक शिववक्ते निर्माण व्हायला हवेत, महाराजांचा खरा इतिहास घराघरात पोहोचायला हवा. छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) इतिहास जगभरात पोहोचायला हवा. लोकांच्या मनात महाराजांचं मंदिर बांधायला हवं. महाराष्ट्र हा महाराजांच्या तत्वावर चालायला हवा. हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) करु शकणार आहेत काय?

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.