Panchavati Nashik Maharashtra : नाशिक पंचवटीला का प्राप्त झालं इतकं महत्त्व? काय आहे पौराणिक कथा?

65
Panchavati Nashik Maharashtra : नाशिक पंचवटीला का प्राप्त झालं आहे इतकं महत्त्व? काय आहे पौराणिक कथा?
Panchavati Nashik Maharashtra : नाशिक पंचवटीला का प्राप्त झालं आहे इतकं महत्त्व? काय आहे पौराणिक कथा?

महाराष्ट्रात गोदावरी नदी नाशिकमधून वाहते. नदीच्या उत्तरेकडच्या भागाला पंचवटी असं म्हणतात. भगवान श्रीराम आणि सीतामाता आणि लक्ष्मणासोबत काही काळ पंचवटीत राहिले होते. त्यामुळे पंचवटी हे एक पवित्र तिर्थस्थळ मानलं जातं. या ठिकाणी वडाची पाच झाडं आहेत. म्हणून या क्षेत्राला पंचवटी असं म्हणतात. इथे जवळच सीता गुंफा आहे. असं म्हणतात की, सीता मातांनी काही काळ इथे वास्तव्य केलं होतं. (Panchavati Nashik Maharashtra)

तपोवन

तपोवनचा शब्दशः अर्थ म्हणजे ध्यान आणि तपश्चर्यासाठी राखून ठेवलेला परिसर असा होतो. पंचवटीच्या पुढे तपश्चर्येसाठी असा परिसर आहे म्हणून त्याला तपोवन असं नाव पडलं. पूर्वीच्या काळी ऋषीमुनी हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यात तपश्चर्या करत असत. लक्ष्मण येथे राहायचा. या ठिकाणी लक्ष्मण आणि हनुमानाची मंदिरे आहेत. गोदावरी नदीचा शांतपणे वाहणारा प्रवाह, हिरवीगार झाडे, जंगलातल्या वनस्पती आणि प्राणी यांच्या समृद्धीमुळे इथल्या निसर्ग सौंदर्याने मन मोहून जातं.

इथून अगदी जवळ कपिलतीर्थ आहे. गोदावरी नदीच्या उजव्या तीरावर अकरा खडकाळ गुहा आहेत जिथे ऋषी-मुनी येऊन राहत असत. इथे गोपालकृष्ण आणि लक्ष्मी-नारायण यांची मंदिरेही आहेत. तसंच १९०४ साली इथे प्रसिद्ध गोशाळा बांधण्यात आली होती. प्राचीन काळी ही भूमी भगवान श्रीरामांच्या चरणस्पर्शाने पवित्र झाली होती.

(हेही वाचा – Mumbai Crime : मोठी बातमी…! कॅश व्हॅनमध्ये सापडल्या ६५०० किलो चांदीच्या विटा)

सीता गुंफा

ही गुंफा पंचवटीमधल्या पाच वटवृक्षांजवळ आहे. अतिशय अरुंद जिन्याच्या साहाय्याने या गुंफेमध्ये प्रवेश करता येतो. या गुंफेमध्ये श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्ती आहेत. इथून डावीकडे आणखी एक गुंफा आहे. त्या गुंफेमध्ये शिवलिंग आहे. त्याच ठिकाणाहून रावणाने सीतेचं अपहरण केलं होतं.

रामकुंड

पंचवटीतलं सर्वात महत्त्वाचं ठिकाण म्हणजे रामकुंड होय. भगवान श्रीरामांनी या ठिकाणी स्नान केलं होतं म्हणून या कुंडाला रामकुंड असं म्हणतात. या कुंडात विसर्जित केलेल्या अस्थी लगेच पाण्यात शोषल्या जातात. या पवित्र कुंडात स्नान करणं अत्यंत पवित्र मानलं जातं.

(हेही वाचा – मिसेस इंडिया गॅलेक्सी Rinima Borah देखील Love Jihad ची ठरलेली बळी; जबरदस्तीने धर्मांतर, गोमांस खायला दिले, मारहाणही केली)

काळाराम मंदिर

पंचवटी इथलं दुसरं महत्त्वाचं मंदिर म्हणजे काळा राम मंदिर होय. हे मंदिर पेशव्यांनी बांधलं होतं. रामनवमी, दसरा आणि चैत्र पाडवा या दिवशी इथून मोठ्या मिरवणुका काढण्यात येतात आणि उत्सव साजरे केले जातात. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे ते काळ्या रंगांच्या दगडांनी बांधण्यात आलं आहे. हे दगड २०० वर्षांपूर्वी हे मंदिर बांधण्यासाठी रामशेज येथून आणण्यात आले होते. या मंदिराचं काम पूर्ण होण्यासाठी १२ वर्षं लागली. तसंच या बारा वर्षांमध्ये रु. २३ लाख एवढा खर्च आला आणि २००० कामगार लागले होते. मंदिराचा कळस ३२ टन सोन्याने तयार करण्यात आलेला आहे. १९३० साली दलित बांधवांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला होता. (Panchavati Nashik Maharashtra)

नारोशंकर मंदिर

पंचवटीच्या परिसरामध्ये नारोशंकर राजेबहाद्दूर यांनी १७४७ साली बांधलेलं रामेश्वराचं नारोशंकर मंदिर आहे. या मंदिराच्या स्थापत्य शैलीला “माया” शैली असं म्हणतात. हे मंदिर म्हणजे १८ शतकातला वास्तुकलेचा सर्वांत सुंदर नमुना आहे. मुख्य मंदिर एका व्यासपीठावर बांधलेलं आहे. मंदिराच्या आतल्या भागापेक्षा बाहेरच्या बाजूंना अप्रतिम शिल्पे कोरलेली आहेत. त्यांत आकर्षक नक्षीकाम, मण्यांच्या माळा धारण केलेल्या मोरांचं शिल्प, पद्मासनात बसलेल्या संतांचे पुतळे इत्यादी शिल्पे आढळून येतात. तसंच निसर्ग समृद्धी दाखवण्यासाठी वेगवेगळ्या प्राणी आणि पक्षांचीही शिल्पे इथे पाहायला मिळतात. (Panchavati Nashik Maharashtra)

(हेही वाचा – Canada तील हिंदू मंदिरावरील हल्ल्याचे खलिस्तानी कनेक्शन; दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या जवळचा अटकेत)

या मंदिराला ११ फुटांची तटबंदी आहे. मंदिराच्या चार कोपऱ्यांमध्ये छत्र्या आहेत. या छत्र्यांना “मेघडंबरी” किंवा “बारासती” असं म्हणतात. त्यापैकी एक मेघडंबरी गोदावरी पुरात वाहून गेली होती. म्हणून सध्या फक्त तीन छत्र्या इथे आहेत. तटबंदी समोरच्या भागात “नारोशंकर बेल” नावाची प्रसिद्ध घंटा बसवलेली आहे. ही घंटा हे पोर्तुगीजांवर मिळवलेल्या विजयाचं स्मारक आहे.

मराठा शासक बाजीराव पेशवे यांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पा यांनी पोर्तुगीजांकडून वसईचा किल्ला जिंकून घेतला होता. त्यावेळी पेशव्यांचे प्रसिद्ध शूरवीर सैनिक श्रीमान नारोशंकर राजेबहाद्दूर यांनी या युद्धात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. किल्ला जिंकल्यानंतर वसईतल्या पोर्तुगीज चर्चची घंटा काढून टाकण्यात आली आणि मोठ्या जल्लोषात हत्तीवरून नाशिकपर्यंत कूच करून नारोशंकर यांना ही घंटा इनाम म्हणून देण्यात आली. या घंटेचा व्यास सहा फूट एवढा आहे. तिचा घंटानाद ५ मैलांपर्यंत ऐकू येतो.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.