Assembly Election 2024: ठाण्यात निवडणूक कर्तव्य नाकारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर उगारला जाणार कारवाईचा बडगा

231
Assembly Election 2024: निवडणूक कर्तव्य नाकारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर उगारला जाणार कारवाईचा बडगा
Assembly Election 2024: निवडणूक कर्तव्य नाकारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर उगारला जाणार कारवाईचा बडगा

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 (Assembly Election 2024) साठीची मतदान प्रक्रिया येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी पार पडणार आहे. ‍निवडणुकीचे काम हे राष्ट्रीय कर्तव्य असून ही मतदान प्रक्रिया पार पाडण्याकामी विविध शासकीय, निमशासकीय आस्थापनांतील अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. परंतु अनेकजण निवडणुकीचे काम नाकारण्यात धन्यता मानीत असल्याचे तसेच कामात टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. निवडणुकीचे काम (Election work) हे राष्ट्रीय कर्तव्य मानले जाते. पाच वर्षातून एकदा होणाऱ्या निवडणुकीतील या राष्ट्रीय कर्तव्यास नाकारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर ‍ लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 134 नुसार शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले आहेत.

(हेही वाचा – Rahul Gandhi अपरिपक्व; काँग्रेसला पुढे नेऊ शकत नाही; Kiren Rijiju यांची टीका)

ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबर रोजी 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे तसेच 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. ठाणे जिल्ह्यात एकूण 6 हजार 955 मतदान केंद्रे असून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी एकूण 7 हजार 717 मतदान केंद्राध्यक्ष, 7 हजार 717 मतदान अधिकारी 15 हजार 434 इतर मतदान अधिकारी अशा एकूण 30 हजार 868 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण देखील पूर्ण झालेले आहे. परंतु अनेक कर्मचारी त्यांना प्राप्त झालेले निवडणूक कर्तव्य आदेश रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच यासाठी अनेक जण विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या शिफारशी घेवून तसेच आजारपणाचा दाखला घेवूनही मोठ्या प्रमाणावर येत असल्याची बाब समोर आली आहे. ज्यांच्या आरोग्यविषयक अडचणी खऱ्या आहेत त्यांच्याबाबतीत प्रशासनाने सहकार्याची भूमिका घेतली आहे.

(हेही वाचा – Narsee Monjee Institute of Management studies : एनएमआयएमएसची MBA ची फी किती आहे?)

तथापि निवडणूक प्रक्रिया पार पडण्यासाठी मनुष्यबळाची नितांत आवश्यकता असून कर्मचाऱ्यांकडून अशा पध्दतीचे वर्तन अपेक्षित नसल्याचेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे (Ashok Shingare) यांनी नमूद केले आहे. ‍निवडणुकीचे काम हे राष्ट्रीय कर्तव्य असून अशा प्रकारे जे कर्मचारी निवडणुकीसाठी त्यांना प्राप्त झालेले आदेश नाकारतील, निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहतील अथवा निवडणुकीच्या कामात हयगय करतील त्यांच्यावर लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 134 नुसार थेट कारवाई करावी, असे निर्देश ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील (18 Assembly constituencies) निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत देण्यात आले आहेत.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.