Thane Vrindavan Society खरोखर आहे का भूताने पछाडलेली?

58
Thane Vrindavan Society खरोखर आहे का भूताने पछाडलेली?
Thane Vrindavan Society खरोखर आहे का भूताने पछाडलेली?

काही ठिकाणं कोणत्याही विशिष्ट कारणाशिवाय पछाडलेली आहेत म्हणून कुप्रसिद्ध होतात. लोक वर्षानुवर्षं रिकामी असलेली वास्तू पाहून घाबरायला लागतात. एखाद्याच्या घरामध्ये कोणाचा तरी गूढ परिस्थितीत मृत्यू झाला तर त्या घराला लगेचच झपाटलेलं घर किंवा शापित असं लेबल लावण्यात येतं.

ठाण्यात असलेली वृंदावन सोसायटी (Thane Vrindavan Society) ही अशाच एका लावलेल्या लेबलचं उदाहरण असलेली वास्तू आहे. ही सोसायटी म्हणजे एक मोठं रेसिडेंशल कॉम्प्लेक्स आहे. ही सोसायटी बांधण्यासाठी १९८४ साली पायाभरणी करण्यात आली होती. पुढे ९० सालच्या दशकाच्या सुरुवातीला हा सोसायटीचा प्रकल्प पूर्ण झाला होता. पण त्यावेळेस या परिसरात लोकसंख्या अगदीच विरळ होती. त्यामुळे इथले फारसे फ्लॅट विकले गेले नाहीत. हल्लीच्या काळात मध्यवर्ती मानला जाणारा हा परिसर त्याकाळी शहरापासून लांब असलेला आणि नो-मॅन्स लँडमध्ये गणला जात होता. याच कारणामुळे अनेक वर्षं या वृंदावन सोसायटीच्या (Thane Vrindavan Society) इमारती रिकाम्याच राहिल्या होत्या. त्यातल्या घरांमध्ये एकही रहिवासी त्यावेळी राहायला नव्हता.

(हेही वाचा – Bhandup Railway Station : भांडुपपासून सर्वात जवळचे स्टेशन कोणते आहे?)

बऱ्याच काळापासून रिकाम्या राहिलेल्या वास्तूंविषयी लोकांना असा विश्वास वाटायला लागतो की, ती जागा भुताने पछाडलेली आहे. लोकांच्या अशा समजुतींना वृंदावन सोसायटी अपवाद नव्हती. या सोसायटीच्या बाबतीतही लोकांचं हेच मत तयार झालं. लोकांचं म्हणणं असं आहे की, बिल्डिंग ६६बी या इमारतींपैकी एका इमारतल्या एका वृद्ध व्यक्तीने घराच्या बाल्कनीतून उडी मारून आत्महत्या केली होती. त्याने मागे कोणतीही चिठ्ठी ठेवली नसल्यामुळे, त्याने आत्महत्या का केली हे कोणालाच माहीती नाही. पण त्याच्या मृत्यूनंतर इमारतीतल्या रहिवाशांना सोसायटीच्या कॉम्प्लेक्समध्ये एका अनैसर्गिक शक्तीची उपस्थिती जाणवत आहे.

एक अशी शक्ती जी कोणालाही दिसत नाही. पण ती शक्ती सगळ्यांना पाहते. घरात असतानाही अनेकदा रहिवाशांची तक्रार असते की, कोणीतरी खिडकीतून आत डोकावत आहे किंवा बाल्कनीतून बाहेर उभे असल्याचा भास त्यांना होतो. काही लोक तर त्यांच्या स्वतःच्या बेडरूममध्येही विचित्र आवाज ऐकल्याचा दावा करतात.

यातली सर्वात मनोरंजक कथा म्हणजे, एकदा एका सुरक्षा रक्षकाच्या गालावर त्याला न दिसणाऱ्या गोष्टीने जोरदार थप्पड मारली होती. काही लोकांना वाटतं की, इमारतीच्या कॉरिडॉरमध्ये चालत असताना त्यांचा पाठलाग केला जात आहे, पण त्यांनी मागे वळून पाहिलं तर त्यांना कोणीही दिसत नाही. वृंदावन सोसायटी ही प्राचीन दफनभूमीवर बांधली गेली होती. म्हणून आता या परिसरात अस्वस्थ आत्म्याने लोकांना हैराण केल्याची चर्चा आहे.

(हेही वाचा – पितृसत्ता ही डाव्यांची संकल्पना; Nirmala Sitharaman यांचा आरोप)

अशा प्रकारच्या या सर्व कथा तुम्हाला इंटरनेटवर फिरत असलेल्या आढळतील. पण तुम्ही जर वृंदावन सोसायटीमधल्या इमारतीतल्या सुशिक्षित रहिवाशांशी प्रत्यक्ष बोललात, तर ते अशा कोणत्याही घटना किंवा अफवांना नकार देतील. वृंदावन सोसायटी ही एक अशी जागा आहे जिथे सामान्य लोक राहतात. या ठिकाणी कोणीही भूत पाहिल्याचा दावा केलेला नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या कॉम्प्लेक्समध्ये एकापेक्षा जास्त व्यक्तींनी आत्महत्या केलेल्या आहेत. पण लोक फक्त एकाच्याच मृत्यूबद्दल बोलतात. यावरून असंच लक्षात येतं की, ते काय बोलताहेत हे त्यांना कळत नाही. अशी शेकडो ठिकाणं आहेत जिथे कित्येक लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. पण ती ठिकाणं पछाडलेली नाहीत.

अशा प्रकारच्या अफवा सुरू करणाऱ्या व्यक्तीला खरोखरच दोष देता येणार नाही. कारण ज्या लोकांना या गोष्टी ऐकायच्या आहेत आणि त्यांच्यावर विश्वास ठेवायचा आहे खरंतर दोष त्यांचा आहे. सध्या वृंदावन सोसायटीचं नाव भारतातल्या पहिल्या १० झपाटलेल्या साईट्समध्ये समाविष्ट केलं आहे. पण जरा विचार करा, वृंदावन सोसायटीमधले फ्लॅट्स अगदी स्वस्त किमतीत बाजारात विकायला काढले, तर ती जागा झपाटलेली आहे असं म्हणून ते स्वस्तात मिळणारे फ्लॅट्स विकत घ्यायला कोण नकार देईल का? प्रत्येकजण त्यांना मिळालेल्या पहिल्या संधीत ते मिळवण्यासाठी धडपड करताना दिसेल. मग सांगा, भुताची आणि शापांची भीती आहेच कुठे?

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.