स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी अपशब्द वापरणाऱ्या ‘हाताला’ निवडून देणार का?; Raj Thackeray यांचा सवाल

79

आमच्या छत्रपतींचा अपमान आमच्याच महाराष्ट्रात करणार्‍या लोकांना तुम्ही निवडून देणार का? महाराष्ट्रात येऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अपशब्द वापरणाऱ्या ‘हाताला’ निवडून देणार का? असे प्रश्न उपस्थित करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मतदारांना साद घातली.

पुण्यातील कसबा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) उमेदवार गणेश भोकरे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ठाकरे बोलत होते. फडके हौद चौकात झालेल्या सभेवेळी मनसेचे नेते व प्रवक्ते अविनाश अभ्यंकर व अनिल शिदोरे, उमेदवार गणेश भोकरे, मनसेचे प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे व अ‍ॅड. गणेश सातपुते, मनसे नेते राजेंद्र ऊर्फ बाबू वागस्कर, महिला सेनेच्या शहराध्यक्षा वनिता वागस्कर आदी उपस्थित होते.

(हेही वाचा महायुतीतील घटक पक्षांना किती जागा मिळणार? Vinod Tawde यांनी दिली आकडेवारी )

केवळ मेट्रो आणि उड्डाणपूल झाले म्हणजे शहराचा विकास होत नाही. येथील आमदार, खासदार निवडून येतात, त्यांच्याकडे कोणतेही व्हिजन नाही, नियोजन नाही. परिणामी शहराचा बोजवरा उडाला आहे. आपण शिक्षित-अशिक्षित आहोत का यापेक्षा आपण सुज्ञ आहोत का, याचा विचार होणे ही आजच्या काळाची गरज आहे मात्र, आपण आपला इतिहास, स्वाभिमान विसरलो आहोत. केवळ जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा देऊन चालणार नाही, तर इतिहास समजून घेऊन तो जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असेही ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.