Terrorist Attack : जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये पुन्हा आतंकवादी हल्ला; चकमकीत एक जवान हुतात्मा

346
Terrorist Attack : जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये पुन्हा आतंकवादी हल्ला; चकमकीत एक जवान हुतात्मा
Terrorist Attack : जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये पुन्हा आतंकवादी हल्ला; चकमकीत एक जवान हुतात्मा

जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) किश्तवाड जिल्ह्यातील जंगल परिसरात रविवारी 10 नोव्हेंबर रोजी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. यात लष्कराचे चार जवान जखमी झाले, तर एक अधिकारी जवान हुतात्मा झाला आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये मागील ४८ तासांत चकमकीच्या तीन घटना समोर आल्या आहेत. या चकमकीत लष्कराचे चार जवानांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, किश्तवाडमध्ये (Kishtwar terrorist attack) झालेल्या चकमकीत 2 पॅरा स्पेशल फोर्सचे राकेश कुमार हुतात्मा झाले आहेत. तर या कारवाईत अन्य चार जवान जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. श्रीनगरमध्ये, शहराच्या पूर्व सीमेला लागून असलेल्या जबरवान हिल्सच्या वरच्या भागात सुरक्षा दल मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात येत आहे.

(हेही वाचा – महायुतीतील घटक पक्षांना किती जागा मिळणार? Vinod Tawde यांनी दिली आकडेवारी )

उत्तर काश्मीरमध्ये गेल्या तीन दिवसांत तिसरी चकमक

शनिवारी रात्री सुरक्षा दलांना चकमा देऊन पळून जाण्यात यशस्वी झालेल्या किमान दोन दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सोपोरच्या रामपुरा भागात मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबवली जात आहे. या कारवाईत आतापर्यंत एक अज्ञात दहशतवादी (terrorist) ठार झाला असून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. उत्तर काश्मीरमध्ये गेल्या तीन दिवसांतील ही तिसरी चकमक आहे. शुक्रवारी बांदीपोरा (Bandipora) येथे झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला, तर सोपोरच्या सगीपोरा भागात दोन पाकिस्तानी दहशतवादी मारले गेले.

हेही पाहा  –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.