Pollution In Mumbai : मुंबईकरांनो सावधान; तुम्ही दररोज शोषत आहात पाच सिगारेटएवढा धूर

94
Pollution In Mumbai : मुंबईकरांनो सावधान; तुम्ही दररोज शोषत आहात पाच सिगारेटएवढा धूर
Pollution In Mumbai : मुंबईकरांनो सावधान; तुम्ही दररोज शोषत आहात पाच सिगारेटएवढा धूर

मुंबईतील वातावरण प्रचंड प्रदूषित झाले आहे. नुकतेच एका अहवालात या प्रदूषणाची तीव्रता किती आहे, हे समोर आले आहे. पाच सिगारेट ओढल्यानंतर जेवढा धूर फुफ्फुसांत जमा होतो तेवढाच धूर प्रदूषणामुळे शरीरात शोषला जात आहे, असा धक्कादायक निष्कर्ष आवाज फाउंडेशनने काढला आहे. आवाज आणि वातावरण फाउंडेशनने (Awaaz Foundation) ऑक्टोबर महिन्यात मुंबईमध्ये नोंदविलेले प्रदूषण जनजागृतीसाठी सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. (Pollution In Mumbai)

(हेही वाचा – Railway Farishte : मध्य रेल्वेचे ऑपरेशन नन्हे फरिश्ते; ७ महिन्यांत हरवलेली ८६१ बालके पालकांकडे सुपुर्द)

सुमेरा अब्दुल अली यांनी या मुद्द्याकडे महापालिका आणि राज्य सरकारचे सातत्याने लक्ष वेधले आहे. यावर रस्त्यावर पाण्याचे फवारे मारण्यासह महापालिकने खूप काम केले. मात्र, वाढत्या प्रदूषणाच्या तुलनेत महापालिकेला मोठ्या स्तरावर उपाययोजना कराव्या लागणार आहेत. गेल्या काही वर्षांपासून मुंबईच्या प्रदूषणात भर पडत असून, वाहनांच्या प्रदूषणात वाढत्या बांधकामांनी प्रदूषणाच्या आगीत तेल ओतले आहे. दिल्लीत तर यापेक्षाही वाईट स्थिती आहे. दिल्लीच्या हवेत श्वास घेणे म्हणजे दररोज ४० सिगारेट ओढण्यासारखे आहे, असे अभ्यासक सांगतात.

काय आहेत प्रदूषणाची कारणे

विविध प्रकारच्या बांधकामांमुळे हवेतल्या प्रदूषणात भर पडली आहे. दिवाळीत फोडण्यात आलेल्या फटाक्यांमुळे तर त्यात आणखीनच भर पडली आहे. मुंबईतला थंडीचा हंगाम प्रदूषणाचा ओळखला जाऊ लागला आहे. धूळ, धूर आणि धुके यांच्या मिश्रणाने तयार होणारे धुरके मुंबईकरांना तापदायक ठरत आहे. दिवाळीत हवेच्या गुणवत्तेचा दर्जा वाईट नोंदविण्यात आला होता; हे त्यांनी लक्षात आणून दिले होते. आजही हे काम जनजागृतीसाठी वेगाने सुरू आहे. उद्योग, वाहने यातून निघणारा धूर अधिक धोकादायक आहे. त्यामुळे यावर उपाययोजना आखल्या जाताना त्या पद्धतीने आखल्या जाव्यात. कारण हवेतील प्रदूषण म्हणजे केवळ धूळ नव्हे, याकडे अभ्यासकांनी लक्ष वेधले आहे. सल्फर, नायट्रोजन, कार्बन डाय ऑक्साइडसारखे विषारी वायू मुंबईकरांच्या शरीरात जात आहेत. पॉवर प्लांट, उद्योग, कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या सल्फरचे प्रमाण अधिक आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून यासंदर्भात कारवाई होत नाही हे दुर्दैव आहे.

प्रदूषणामुळे दमा, टीबी, कॅन्सर, सर्दी, खोकला, डोळे, त्वचा आणि हृदय रोगांचे रुग्ण वाढत आहेत. (Pollution In Mumbai)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.