पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्ममधील मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी, ७ जुलै रोजी पार पडला, मंत्री आणि राज्यमंत्री असे मिळून ४३ जणांनी मंत्री पदाची शपथ घेतली. त्यामध्ये समाजातील विविध जाती-जनजातीला प्रतिनिधीत्व देण्याचा प्रयत्न या मंत्रिमंडळ विस्तारात करण्यात आलेला आहे. या मंत्रिमंडळ विस्तारामुळे आता पंतप्राधन मोदी यांच्या मंत्रिमंडळात सर्वाधिक तरुण मंत्र्यांची ब्रिगेड तयार झाली आहे. त्यामध्ये वकील, डॉक्टर, अभियंता आणि माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
शोषित, वंचित, पीडित आणि आदिवासींवर लक्ष!
पंतप्रधान मोदी यांच्या मेगा मंत्रिमंडळ विस्तारात शोषित, वंचित, पीडित आणि आदिवासी समाजाला प्रतिनिधीत्व देऊन समाजाचा सर्वांगिण विचार केला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात आता ओबीसी समाजाचे २७, अनुसूचित जातीचे १२, अनुसूचित जनजातीचे ८, अल्पसंख्याक समाजाचे ५ आणि ११ महिला मंत्री झाले आहेत.
(हेही वाचाः हे आहेत मोदी सरकारचे संभाव्य 24 मंत्री! महाराष्ट्रातून कोणाला मिळणार संधी?)
अशी आहे युवा ब्रिगेड!
मंत्रिमंडळात १४ मंत्री हे ५० हुन कमी वयाचे आहेत, ज्यामध्ये ६ कॅबिनेट मंत्री बनले आहेत, आता मंत्र्यांचे सरासरी वय हे ५८ पर्यंत झाले आहे, त्यामुळे आतापर्यंतच्या इतिहासात हे मंत्रिमंडळ सर्वात तरुण मंत्रिमंडळ बनले आहे.
अनुभव पुस्तिका!
या सरकारमध्ये ४ केंद्रीय मंत्री हे माजी मुख्यमंत्री आहेत. ज्यामध्ये नारायण राणे, सर्बानंद सोनोवाल यांचा समावेश आहे. १८ माजी मंत्री आहेत आणि ३९ माजी आमदार आहेत. या मंत्रिमंडळात १३ अधिवक्ता, ६ डॉक्टर, ५ अभियंते, ७ माजी प्रशासकीय अधिकारी आहेत.
Join Our WhatsApp Community