भारताला अमेरिकेतील सत्तांतराची चिंता नाही; परराष्ट्रमंत्री S. Jaishankar यांनी सांगितले कारण

64
भारताला अमेरिकेतील सत्तांतराची चिंता नाही; परराष्ट्रमंत्री S. Jaishankar यांनी सांगितले कारण
भारताला अमेरिकेतील सत्तांतराची चिंता नाही; परराष्ट्रमंत्री S. Jaishankar यांनी सांगितले कारण

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी येणाऱ्या अनेक प्रमुखांशी चांगले संबंध ठेवले आहेत. अतिशय स्वाभाविक पद्धतीने ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी असणारे संबंध वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करतात. मला याची कल्पना आहे की, आज जगभरातले देश अमेरिकेबाबत काळजीत आहेत. आपण हे मान्य करायलाच हवं. पण आपण त्यापैकी एक नाही आहोत. निकालांनंतर डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी उचललेल्या पहिल्या तीन फोन कॉल्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi) समावेश होता, असे उद्गार परराष्ट्रमंत्री एस जयशंकर (S. Jaishankar) यांनी काढले आहेत.

(हेही वाचा – Pollution In Mumbai : मुंबईकरांनो सावधान; तुम्ही दररोज शोषत आहात पाच सिगारेटएवढा धूर)

मुंबईत आयोजित आदित्य बिर्ला स्कॉलरशिप कार्यक्रमात जयशंकर यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. या वेळी हार्वर्ड विद्यापीठाचे प्राचार्य व राजकीय तत्वज्ञ मायकल जे. सँडल हेदेखील उपस्थित होते. या वेळी आंतरराष्ट्रीय संबंधांवर जयशंकर यांनी भाष्य केले.

अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाली आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय राजकारणात अमेरिका कोणती भूमिका घेईल ?, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. भारताला अमेरिकेची चिंता नसल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी स्पष्ट केले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.