Ind vs SA, 2nd T20 : संजू सॅमसनच्या नावावर एक नकोसा विक्रम; पुन्हा शून्यावर बाद 

Ind vs SA, 2nd T20 : सॅमसनच्या नावावर लागोपाठ २ टी२० शतकं आहेत आणि हा नकोसा विक्रमही 

71
Ind vs SA, 2nd T20 : संजू सॅमसनच्या नावावर एक नकोसा विक्रम; पुन्हा शून्यावर बाद 
Ind vs SA, 2nd T20 : संजू सॅमसनच्या नावावर एक नकोसा विक्रम; पुन्हा शून्यावर बाद 
  • ऋजुता लुकतुके

भारताचा धडाकेबाज सलामीवीर संजू सॅमसनने सलग दोन टी-२० सामन्यांत शतकं झळकावण्याचा विक्रम अलीकडे केला आहे. गेबेखामध्ये तो सलग तिसऱ्या शतकासाठी मैदानात उतरला. पण, त्याचा डाव तीन चेंडूंमध्ये शून्यावर आटोपला. मार्को यानसेनने त्याचा त्रिफळा उडवला. आणि तो शून्यावर बाद झाला. यामुळे एक नकोसा विक्रम त्याच्या नावावर लागला आहे. एका कॅलेंडर वर्षांत चारदा शून्यावर बाद होणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. (Ind vs SA, 2nd T20)

(हेही वाचा- ‘व्यापाऱ्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल केला’; Shiv Sena UBT चे संजय राऊत व्यापाऱ्यांवर का घसरले?)

यानसेनच्या एका चेंडूवर सॅमसनने पुढे येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण, ही चाल बरोबर ओळखून यानसनेनने चेंडू आतल्या बाजूला वळवला. आणि सॅमसनचा त्रिफळा उडाला. (Ind vs SA, 2nd T20)

Insert tweet – https://x.com/JioCinema/status/1855616091290210741

पहिल्याच षटकात संजू सॅमसन बाद झाल्यावर भारताची आघाडीची फळीही लगोलग परतली. अभिषेक शर्मा ४ तर सुर्यकुमार यादवही ४ धावा करून माघारी परतला. त्यामुळे भारताची अवस्था ३ बाद १५ अशी झाली. एकूणच या सामन्यात भारताकडून एकही भागिदारी होऊ शकली नााही. त्याचा फटका भारतीय संघाला बसला. निर्धारित २० षटकांत भारतीय संघ ६ बाद १२४ धावांच करू शकला.  (Ind vs SA, 2nd T20)

(हेही वाचा- Ind vs SA, 2nd T20 : १७ धावांत ५ बळी घेणारा वरुण चक्रवर्ती या विक्रमांचा शिलेदार)

टी-२० क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असल्यामुळे शून्यावर खेळाडू बाद होण्याचे प्रकारही घडतात. यात आघाडीवर आहे तो वेस्ट इंडिजचा आंद्रे रसेल. ८३ सामन्यांमध्ये तो २४ वेळा भोपळाही फोडू शकला नाहीए. तर त्या खालोखाल श्रीलंकेचा शनाका २० वेळा शून्यावर बाद झाला आहे. शनाका एकूण १०२ सामने खेळला आहे. तर भारताचा रोहीत शर्माही या यादीत आहे. १९ भोपळ्यांसह तो तिसऱ्या स्थानावर आहे. (Ind vs SA, 2nd T20)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.