IPL Mega Auction : चेन्नई सुपर किंग्जची रिषभ पंतसाठी फिल्डिंग, बंगळुरू संघाला द्राक्ष आंबट

IPL Mega Auction : धोनीला युवा आयुष म्हात्रेच्या फलंदाजीनेही भुरळ घातली आहे.

57
IPL Mega Auction : चेन्नई सुपर किंग्जची रिषभ पंतसाठी फिल्डिंग, बंगळुरू संघाला द्राक्ष आंबट
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलच्या २४ आणि २५ तारखेला होणाऱ्या लिलावासाठी फ्रँचाईजींचे खेळाडूंसाठी फिल्डिंग लावण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. चेन्नई सुपर किंग्ज सध्या यात आघाडीवर दिसत आहे. त्यांनी दिल्ली कॅपिटल्सकडून मुक्त झालेला रिषभ पंत गळाला लावल्याची चर्चा जोरात सुरू आहे. रिषभ पंत धडाकेबाज फलंदाज आहे. शिवाय तो यष्टीरक्षण आणि संघाचं नेतृत्वही करू शकतो. शिवाय तो स्वत: दिल्ली कॅपिटल्सकडे खुश नव्हता. त्यामुळे त्याने स्वत: दुसरीकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे खेळाडूंच्या लिलावात त्याच्यावर सगळ्यांच्या उड्या पडणार हे निश्चित होतं. खेळाडू कायम ठेवतानाची मुदत संपली तेव्हाच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे त्याला आपल्याकडे ओढण्याचे प्रयत्न सुरू होते. पण, अलीकडेच रिषभ पंतची चेन्नईचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीबरोबर एक बैठक झाली आहे आणि त्यानंतर रिषभ पंतवर चेन्नईकडे जाईल अशी चर्चा सुरू झाली आहे. तसं झालं तर रिषभ पंतसाठी या खेळाडूंच्या लिलावात किमान तीन संघांकडून मोठी बोली लागेल हे उघड आहे. (IPL Mega Auction)

(हेही वाचा – ‘व्यापाऱ्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल केला’; Shiv Sena UBT चे संजय राऊत व्यापाऱ्यांवर का घसरले?)

चेन्नई संघाने सध्याचा कर्णधार ऋतुराज गायकवाड, महिषा पथिराणा, शिवम दुबे, रवींद्र जाडेजा आणि महेंद्रसिंग धोनी यांना आपल्याकडे कायम राखलं आहे. धोनीसाठी त्यांनी अननुभवी खेळाडूचं कार्ड वापरलं आहे. हे खेळाडू कायम राखण्यात चेन्नई संघाचे ६७ कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यामुळे मेगा लिलावासाठी त्यांच्याकडे आता ५३ कोटी रुपये शिल्लक आहेत. या सध्याचा आयपीएलचा सगळ्यात महागडा खेळाडू हेनरिक क्लासेन हा आहे. त्याला कायम ठेवण्यासाठी सनहायझर्स हैद्राबादने २३ कोटी रुपये मोजले आहेत. लिलावात बोली वाढत गेली तर रिषभसाठी याहून जास्त बोली लागू शकते. त्यामुळेच चेन्नईने इतकी मोठी रक्कम शिल्लक ठेवल्याचं बोललं जात आहे. रिषभला विकत घेण्यासाठी चेन्नईला ३० कोटी रुपयांपर्यंतची रक्कम मोजावी लागू शकते. (IPL Mega Auction)

(हेही वाचा – Rohit Sharma : भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना; रोहित शर्मा संघाबरोबर नाही )

दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्ज संघाचे क्रिकेट संचालक काशीविश्वेसरन यांनी अलीकडे अंबाती रायडूबरोबर विलावाविषयी एका युट्यूब वाहिनीशी चर्चा केली आहे आणि यात बोलताना त्यांनी आपली रणनीती स्पष्ट केली. ‘आम्ही रिषभ पंतसाठी प्रयत्न करूही शकतो. मी ते नाकारत नाही. पण, आमचं प्राधान्य संघाच्या वाटचालीत आतापर्यंत योगदान दिलेल्या खेळाडूंना परत आणण्याचं आहे. त्यावर आमचं विशेष लक्ष असेल आणि त्यासाठीच लिलावात आम्ही प्रयत्न करू. आम्ही कर्णधार ऋतुराज, धोनी आणि प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांच्याशी चर्चा केली आहे. सगळ्यांचंच म्हणणं आहे की, स्थिर संघ जास्त महत्त्वाचा. त्यामुळे आधी आम्ही संघ बांधणीला महत्त्व देणार आहोत,’ असं काशी प्रोव्होक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले आहेत. दरम्यान, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी खेळाडूंना हेरण्याच्या कामी फ्रँचाईजीची मदत करताना दिसत आहे. कारण, रिषभबरोबर चर्चाही त्यानेच केली आणि रणजी सामन्यात मुंबईकर युवा सलामीवीर आयुष म्हात्रेच्या कामगिरीवरही धोनी खुश आहे आणि त्यानेच आयुषला चेन्नईच्या निवड चाचणीसाठी बोलावून घेतलं आहे. (IPL Mega Auction)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.