९ वर्षांच्या मुलींचा निकाह होणार; Iraq मध्ये मुसलमान महिलांच्या लैंगिक शोषणाचा कायदा

114
९ वर्षांच्या मुलींचा निकाह होणार; Iraq मध्ये मुसलमान महिलांच्या लैंगिक शोषणाचा कायदा
९ वर्षांच्या मुलींचा निकाह होणार; Iraq मध्ये मुसलमान महिलांच्या लैंगिक शोषणाचा कायदा

इराक (Iraq) सरकारने निकाह कायद्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण योजना आखली आहे. या कायद्याअंतर्गत मुलींच्या लग्नाचे वय ९ वर्षांपर्यंत कमी करण्यात आले आहे. या प्रस्तावाला इराकच्या संसदेत चर्चेसाठी ठेवण्यात आले. जर हा कायदा पास झाला तर, इराकमधील पुरुषांना ९ वर्षांच्या मुलींशी निकाह करण्याची परवानगी मिळेल.

( हेही वाचाRohit Sharma : भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना; रोहित शर्मा संघाबरोबर नाही )

हा कायदा इराकची ‘वैयक्तिक स्थिती कायद्या’च्या बदलामागील एक प्रयत्न आहे. या कायद्याला ‘कायदा १८८’ म्हणून ओळखले जाते. यात महिलांच्या अधिकारांचा समावेश आहे. या कायद्याला १९५९ मध्ये लागू करण्यात आले होते. त्यामुळे मध्य पूर्वमधील प्रगतीशील कायदा म्हणून याला ओळखले जाते. कारण हा सर्व धार्मिक समाजासाठी समान कायदा आहे.

दरम्यान इराकी (Iraq) सरकारने या कायद्याबाबत संशोधन करून नवा प्रस्ताव ठेवला आहे. इराक हे संशोधन इराकमधील (Iraq) बाल विवाह दर सर्वाधिक असताना करत होता. तिथे निकाहाचे वय कमी असणे हे गरीब आणि रुढीवादी शिया मुस्लिम समुदायात सामान्य आहे.

वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, वर्तमानात २८ टक्के इराकी (Iraq) मुलींचे लग्न १८ वर्षांआधी केले जाते. आता प्रस्तावित बदलांचा उद्देश इस्लामी शरिया कायदा (Islamic Sharia law) कडक करणे हा आहे. कायद्यात सांगितल्याप्रमाणे अनैतिक संबंधांपासून तरुणींचा बचाव करणे हा देखील उद्देश आहे. (Iraq)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.