IMD Alert : राज्यातील आठ जिल्ह्यांना गुरुवार-शुक्रवारी पावसाचा इशारा

140
IMD Alert : राज्यातील आठ जिल्ह्यांना गुरुवार-शुक्रवारी पावसाचा इशारा

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये गुरुवार व शुक्रवारी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. नैऋत्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे देशातील हवामानात पुन्हा बदल होताना दिसत आहे. राज्यात थंडीची चाहूल लागलेली असताना अचानक पुन्हा पावसाचा इशारा दिल्यामुळे आगामी काही दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे. (IMD Alert)

(हेही वाचा – हिंदू आणि शीखांना Halal प्रमाणित जेवण न देण्याचा एअर इंडियाचा निर्णय)

राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव या आठ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील काही भागांत सकाळी दाट धुके आणि दुपारी बारापर्यंत किंचित थंडी जाणवत होती. राज्यातील आठ जिल्ह्यांना 14 व 15 नोव्हेंबर रोजी हलक्या सरींचा अंदाज दिला आहे. त्यामुळे त्या भागातील किमान तापमानात किंचित वाढ होऊन थंडी कमी होईल, असा नवा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. (IMD Alert)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.