Ashwin on New Zealand Debacle : न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवानंतर भारतीय ड्रेसिंग रुमची अशी होती अवस्था…

Ashwin on New Zealand Debacle : भारतीय खेळाडूंनाही पराभव जिव्हारी लागल्याचं अश्विनने म्हटलं आहे. 

104
Ashwin on New Zealand Debacle : न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवानंतर भारतीय ड्रेसिंग रुमची अशी होती अवस्था…
  • ऋजुता लुकतुके

न्यूझीलंड संघाने भारताला भारतात ३-० ने हरवलं त्या गोष्टीला आता जेमतेम एक आठवडा झाला आहे. पण, हा पराभव भारतीय चाहत्यांना चांगलाच जिव्हारी लागला. एकतर मायदेशात झालेला पराभव आणि त्यातच एकही कसोटी पूर्ण चार दिवसही चालल नाही ही सल. अशावेळी खुद्द भारतीय संघाला हा पराभव किती बोचला असेल? पराभवानंतर भारतीय ड्रेसिंग रुममध्ये नेमकं कसं वातावरण होतं? संघातील एक ज्येष्ठ खेळाडू रवीचंद्रन अश्विन याविषयी मोकळेपणाने बोलला आहे. (Ashwin on New Zealand Debacle)

(हेही वाचा – Economic Zone Airports : विमानतळांवर किफायतशीर दरात मिळणार खाद्यपदार्थ)

फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर भारतीय फिरकीपटूंपेक्षा किवी कामचलाऊ फिरकीपटूच जास्त चालले. खुद्द अश्विन आणि रवींद्र जडेजा तितकेसे यशस्वी ठरले नाहीत. ‘मी नंतर असं वाचलं कुटेतरी की, भारतात इतका मोठा पराभव भारताचा कधी झालाच नव्हता. मला आणखी खजील झाल्यासारखं झालं. सगळे इतके हताश झालो होतो की, काय प्रतिक्रिया द्यायची हेच कळत नव्हतं. मला माझ्या अख्ख्या कारकीर्दीत असा प्रसंग माझ्यावर आलेला माहीत नाही. पुढचे २-३ दिवस आम्ही एकमेकांशी बोलू शकत नव्हतो. मैदानात भावनांना जागा नसतात. पण, बाहेर अजून मला कळत नाही की काय बोलायचं. आम्हा सगळ्यांनाच हलवून सोडणारा तो पराभव होता,’ असं अश्विनने आपल्या युट्यूब वाहिनीवर बोलून दाखवलं आहे. (Ashwin on New Zealand Debacle)

(हेही वाचा – हिंदू आणि शीखांना Halal प्रमाणित जेवण न देण्याचा एअर इंडियाचा निर्णय)

संपूर्ण मालिकेत भारतीय फलंदाजी चांगली झाली नाही. पण, गोलंदाज म्हणून अश्विनने आपल्यावरही जबाबदारी घेतली. ‘फलंदाज आणि गोलंदाज म्हणूनही मी कमी पडलो. गोलंदाज असल्यामुळे मला धावांचं महत्त्व माहीत आहे. त्या गाठीशी असल्या की, गोलंदाज वर्चस्व गाजवू शकतो. पण, तळाला येऊन चांगली फलंदाजी करणं मला जमलं नाही. गोलंदाजीत मी कुठे कमी पडलो याचाही मी अभ्यास मी केलेला आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवानंतर आता भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. तिथे भारताला ऑस्ट्रेलिया विरुद्ध ५ कसोटी सामने खेळायचे आहेत आणि आयसीसी कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीतील प्रवेशासाठी या ५ पैकी ४ कसोटी जिंकणं भारतासाठी बंधनकारक आहे. भारत आमि ऑस्ट्रेलिया दरम्यानची पहिली कसोटी २२ नोव्हेंबरला पर्थ इथं सुरू होणार आहे. (Ashwin on New Zealand Debacle)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.