रोबोटिक तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रियांमध्ये अचूकता आली असून, वेळेची आणि खर्चाची बचत होत आहे. खासगी रुग्णालयांमध्ये रोबोटिक शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढत आहे. आता ससून रुग्णालयाच्या (Sassoon Hospital) सर्जरी विभागातही रोबोट दाखल होणार आहे. भारतीय बनावटीचा रोबोट खरेदी करणारे ससून हे राज्यातील पहिले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ठरले आहे.
(हेही वाचा – हिंदू आणि शीखांना Halal प्रमाणित जेवण न देण्याचा एअर इंडियाचा निर्णय)
तंत्रज्ञानातील अचूकता, नेमकेपणा, वेळेची बचत, कमी वेदना यामुळे रोबोटिक शस्त्रक्रियांना अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. सध्या खासगी रुग्णालयांमध्ये प्रामुख्याने सांधे बदलांच्या शस्त्रक्रियेमध्ये रोबोचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.आता हर्निया, गॉल ब्लॅडर, पोटाच्या, गायनॅकॉलिजकल अशा शस्त्रक्रिया रोबोटिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केल्या जात आहेत. ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात रोबोटिक आर्मच्या सहाय्याने पहिली शस्त्रक्रिया प्रायोगिक तत्त्वावर पार पडली. आता रोबोटिक शस्त्रक्रियांमध्ये ससूनने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.
(हेही वाचा – Maharashtra Assembly Election : मजुरांचे अड्डे ओस; कामासाठी मिळेनात मजूर)
सध्या रोबोटिक सर्जरीबाबत देशात विविध प्रयोग केले जात आहेत. मात्र, रोबोटिक सर्जरी अतिशय महाग असते. विशेषत: खासगी रुग्णालयांमध्ये रोबोटिक सर्जरीसाठी लाखो रुपयांचा खर्च होतो. गरीब रुग्णांना एवढा खर्च करणे शक्य नसते. त्यामुळे ससून रुग्णालयातील (Sassoon Hospital) रोबोटिक शस्त्रक्रिया रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे.पुढील एक-दोन महिन्यांमध्ये रुग्णांसाठी रोबोटिक शस्त्रक्रिया उपलब्ध होतील. रोबोट भारतीय बनावटीचे असून हे प्रगत तंत्रज्ञान हाताळण्यासाठी डॉक्टरांना विशेष प्रशिक्षण देण्यात येईल. रुग्णांना रोबोटिक शस्त्रक्रियांचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community