अयोध्येतील श्रीराम मंदिर उडवणार; खलिस्तान समर्थक Gurpatwant Singh Pannun पुन्हा बरळला

79
अयोध्येतील श्रीराम मंदिर उडवणार; खलिस्तान समर्थक Gurpatwant Singh Pannun पुन्हा बरळला
अयोध्येतील श्रीराम मंदिर उडवणार; खलिस्तान समर्थक Gurpatwant Singh Pannun पुन्हा बरळला

खलिस्तान समर्थक दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू (Gurpatwant Singh Pannun) पुन्हा बरळला आहे. पन्नू (Gurpatwant Singh Pannun) याने अयोध्येतील श्रीराम मंदिरासह अन्य हिंदू मंदिरे उडवण्याची धमकी दिली आहे. यासंदर्भात बंदी घालण्यात आलेल्या शीख फॉर जस्टिस संघटनेने एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये दि. १६ आणि १७ नोव्हेंबर रोजी श्रीराम मंदिरावर हल्ला करण्याचा इशारा दिलाय. कॅनडातील ब्रॅम्प्टन येथून हा व्हिडिओ रॅकॉर्ड करण्यात आला आहे.

( हेही वाचा : IPL Mega Auction : चेन्नई सुपर किंग्जची रिषभ पंतसाठी फिल्डिंग, बंगळुरू संघाला द्राक्ष आंबट

पन्नू या व्हिडिओत म्हणतो की, ‘आम्ही हिंदूत्व विचारसरणीचे मूळ असलेल्या अयोध्येला हादरवून टाकू’, असे पन्नू (Gurpatwant Singh Pannun) म्हणाला. या व्हिडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जानेवारीतील राममंदिर उद्धाटनावेळी प्रार्थना करत असल्याचे दृश्य दाखवण्यात आले आहे. तसेच पन्नूने (Gurpatwant Singh Pannun) शीख दंगलीला ४० वर्ष होण्याच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाच्या विमानावर हल्ला होऊ शकतो, असे ही सांगितले आहे. त्याचबरोबर एअर इंडिया विमानातून प्रवास न करण्याचा इशारा प्रवाशांना दिला आहे. (Gurpatwant Singh Pannun)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.