Arjun Erigaisi : अर्जुन एरिगसी जागतिक क्रमवारीत दुसरा क्रमांक गाठणारा आनंद नंतरचा दुसरा भारतीय

Arjun Erigaisi : चेन्नई मास्टर्स स्पर्धेत अर्जुनने अव्वल कामगिरी केली आहे.

59
Arjun Erigaisi : अर्जुन एरिगसी जागतिक क्रमवारीत दुसरा क्रमांक गाठणारा आनंद नंतरचा दुसरा भारतीय
  • ऋजुता लुकतुके

भारताचा अव्वल बुद्धिबळपटू अर्जुन एरिगसीने (Arjun Erigaisi) जागतिक बुद्धिबळ ताज्या क्रमवारीत दुसरा क्रमांक नुकताच पटकावला आहे. त्यानंतर चेन्नई मास्टर्स स्पर्धेतही तो अव्वल स्थानावर टिकून आहे. ६ सामन्यांतून त्याचे ४ गुण झाले आहेत. पण, एरोनियाचा माक्झिम लाग्रेव साडे तीन गुणांसह त्याच्या मागोमाग आहे. अर्जुनचा मुकाबला भारताच्याच परहम मागसुदलूशी होता. पण, हा सामना बरोबरीत सोडवण्यात परहम यशस्वी झाला.

५७ चालींनंतर दोन्ही भारतीयांनी हा डाव बरोबरीत सोडवण्याचं मान्य केलं. तर अरोनियन लाग्रेवने त्याचा सामना आरामात जिंकून एक गुण वसूल केला. त्यामुळे तो साडे तीन गुणांवर पोहोचला आहे.

(हेही वाचा – IPL Mega Auction : चेन्नई सुपर किंग्जची रिषभ पंतसाठी फिल्डिंग, बंगळुरू संघाला द्राक्ष आंबट)

गेल्याच आठवड्यात अर्जुन एरिगसीने (Arjun Erigaisi) चेन्नई स्पर्धेतच मोठा विजय मिळवत दुसरा क्रमांक गाठला आहे. एलेक्सी सराानाला हरवून एरिगसीने ही मजल मारली आहे. या आठवड्यात फिडेची क्रमवारी अपडेट होईल तेव्हा अर्जुन एरिगसी दुसऱ्या क्रमांकावर असेल. स्वीडनचा मॅग्नस कार्लसन पहिल्या क्रमांकावर आहे. २१ वर्षीय अर्जुनने आतापर्यंत या स्पर्धेत ३ विजय मिळवले आहेत.

जागतिक क्रमवारीत आता स्वीडनच्या मॅग्नस कार्लसनचे २७३१ गुण आहेत. तर अर्जुन एरिगसीचे सध्या २९०५.८ एलो गुण झाले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर फाबियानो कारुआना आहे. अर्जुन एरिगसी विश्वनाथन आनंद नंतर २,८०० एलो गुण गाठणारा फक्त दुसरा भारतीय ठरला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.