Delhi Assembly Election : निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलाला दिल्लीमध्ये उधाण

95
Delhi Assembly Election चे बिगुल वाजले; आपची पहिली यादी जाहीर
  • प्रतिनिधी 

दिल्लीतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मतीन अहमद यांनी आपमध्ये प्रवेश केला. तर, ज्येष्ठ नेते हरतरणसिंग बल्ली यांनी आपला राम राम ठोकून भाजपामध्ये वापसी केली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर देशाच्या राजधानीत पक्षबदलाच्या सत्राला उधाण येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मुस्लिम समाजातील वजनदार नेते अशी ओळख असरणाऱ्या अहमद यांचा आप प्रवेश काँग्रेससाठी मोठा हादरा मानला जात आहे. ते तब्बल पाचवेळा दिल्ही विधानसभेवर निवडून गेले होते. याआधी त्यांचे पुत्र शुबैर अहमद आणि नगरसेविका असणाऱ्या सुनबाई शगुफ्ता चौधरी यांनी आपमध्ये प्रवेश केला. (Delhi Assembly Election)

(हेही वाचा – हेलिकॉप्टरमधून उतरताच बॅग तपासल्यावर Uddhav Thackeray संतापले )

त्यामुळे अहमद हेही काँग्रेस ला रामराम ठोकणार असल्याचे निश्चित मानले जात होते. एकीकडे अहमद यांच्या प्रकारामुळे उत्साह वाढलेल्या आपला दुसरीकडे झटकाही बसला. त्या पक्षातून सरदार हरशरण सिंह बल्ली दिल्लीतील हरिनगर मतदारसंघातून चारवेळा आमदार झालेले आहेत. ते पहिल्यांदा 1993 मध्ये आमदार झाले, त्यानंतर 2013 मध्ये शेवटच्यावेळी आमदार झाले होते. याशिवाय ते मदनलाल खुराना सरकारमध्ये मंत्री देखील होते. त्यांनी उद्योग, कामगार, तुरुंग, भाषा, गुरुद्वारा प्रशासन अशा अनेक विभागांची जबाबदारी सांभाळलेली आहे. हरशरण सिंह बल्ली यांनी रविवारी दिल्ली भाजपाचे (BJP) अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा आणि त्याचं जुने सहकारी सुभाष आर्य व सुभाष सचदेवा यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांचे पुत्र गुरमीत सिंह रिंकू आम आदमी पार्टीचा तरूण चेहरा होता. मात्र त्यांनीही वडिलांसोबत भाजपामध्ये प्रवेश केल्याने आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसला आहे. (Delhi Assembly Election)

(हेही वाचा – Mumbai Airport वर २.६७ कोटींचे सोने जप्त; दोन कर्मचाऱ्यांना अटक)

जेव्हा 2013 मध्ये बल्ली यांना भाजपाकडून उमेदवारी मिळाली नव्हती, तेव्हा त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा भाजपामध्ये प्रवेश केला होता. मग पुन्हा 2020 मध्ये त्यांनी पक्ष बदल करत अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत आम आदमी पार्टीत प्रवेश केला होता आणि आता ते पुन्हा एकदा भाजपामध्ये आले आहेत. (Delhi Assembly Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.