Rashtra Sevika Samiti : महिलांनी राष्ट्र उभारणीसाठी पुढे यावे; शांताअक्का यांचे आवाहन

53
Rashtra Sevika Samiti : महिलांनी राष्ट्र उभारणीसाठी पुढे यावे; शांताअक्का यांचे आवाहन
  • प्रतिनिधी 

महिलांमध्ये आत्मविश्वासाची भावना निर्माण करून राष्ट्र उभारणीच्या कार्यात त्यांचा सहभाग वाढविण्यासाठी राष्ट्र सेविका समिती कार्य करीत असल्याचे प्रतिपादन समितीच्या प्रमुख शांताअक्का यांनी केले. (Rashtra Sevika Samiti)

राष्ट्र सेविका समितीच्या दिल्ली शाखेच्यावतीने शाखा संगम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी त्या बोलत होत्या. यात जवळपास एक हजार प्रशिक्षित महिला सहभागी झाल्या होत्या. दिल्लीतील 30 शाखांनी भगव्या ध्वजाला वंदन करीत सूर्याची प्रार्थना केली. यावेळी समता, क्रीडा व्यायाम व योगासने सादर करण्यात आले. देवी अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरवात झाली. रीवा सूद आणि शशी बुबना या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. (Rashtra Sevika Samiti)

(हेही वाचा – IMD Alert : राज्यातील आठ जिल्ह्यांना गुरुवार-शुक्रवारी पावसाचा इशारा)

राष्ट्र सेवेच्या कार्यात महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी तरुणीना समितीशी जोडून त्यांच्यात संघटन कौशल्य निर्माण केले जात आहे असे शांताअक्का यांनी यावेळी सांगितले. महिलांनी गीताच्या 16 अध्यायचे वाचन करायला हवे. हा अध्या य निर्भीड बनवितो असेही त्या म्हणाल्या. (Rashtra Sevika Samiti)

समितीची स्थापना 1936 मध्ये झाली होती. यंदा समितीने 88 वर्ष पूर्ण केले आहे. शरीर आणि मनाला पैशाची जोड दिली तर स्त्री मजबूत राहते असे मत रीवा सूद यांनी व्यक्त केले. 2026 मध्ये समितीला 90 वर्षे पूर्ण होणार आहे. अशात दिल्ली शाखेकडून 900 प्रशिक्षित सेविका आणि 90 घोष वाक सेविकांचा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. (Rashtra Sevika Samiti)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.