Pravin Darekar यांनी संजय राऊतांना दिला ‘हा’ इशारा; म्हणाले…

98
Pravin Darekar यांनी संजय राऊतांना दिला 'हा' इशारा; म्हणाले...
  • प्रतिनिधी

उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी अमित शाह यांच्याविरोधात वक्तव्य करताना व्यापारी असा उल्लेख केला होता. त्यांच्या या विधानाला भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. व्यापारी आणि दुकानदार कष्ट करतात, ग्राहकांना सेवा देण्याचा प्रयत्न करतात. तोही एक कष्टकरी वर्ग आहे. राऊत यांनी कष्टकरी वर्गाचा अपमान केला असून त्यांनी दुकानदार, व्यापाऱ्यांची माफी मागावी. अन्यथा हे दुकानदार पुड्या बांधता बांधता निवडणुकीत तुमचा कडेलोट केल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराच दरेकर यांनी दिला आहे. सोमवारी (११ नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत बोलताना भाजपा गटनेते दरेकर यांनी राज्यातील विविध राजकीय विषयांवर भाष्य करत विरोधकांवरही टिकेची झोड उठवली. या पत्रकार परिषदेला भाजपा मुंबई उपाध्यक्ष रवी राजा उपस्थित होते.

संजय राऊत यांनी सर्व्हेबाबत केलेल्या विधानांवर दरेकर (Pravin Darekar) म्हणाले की, सर्व्हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात, त्यांचे एक अनुमान असते. निश्चितच स्वाभाविकपणे सर्व्हे महायुतीच्या बाजूने असल्याने आमचा उत्साह द्विगुणित होईल. संजय राऊत खोटं बोलण्यात विश्वविक्रम करू शकतात. सकाळी उठले की खोटं बोलायचे हा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. २८८ पैकी उद्या ३०० जागा आमच्या येणार नाहीत आणि त्यांनी लढविल्या आहेत त्यापेक्षा दुप्पट जागा येणार नाहीत असे बोलले नाहीत हे आपले नशीब समजायचे, असा टोलाही लगावला.

(हेही वाचा – CJI Sanjiv Khanna : सरन्यायमूर्ती खन्ना यांचा कार्यकाळ केवळ 6 महिन्यांचा)

तसेच संजय राऊतांची तीचतीच कॅसेट रिपीट होतेय. ईडी, सीबीआय या तपास यंत्रणावर गेले वर्षानुवर्ष बोलताहेत. ज्या तपास यंत्रणांचा वापर काँग्रेसने त्यांची देशात सत्ता असताना ती टिकवण्यासाठी, विरोधकांची सत्ता घालविण्यासाठी केला हे संजय राऊत विसरले आहेत. अमित शहा देशाचे नेते आहेत. त्यांनी कालही सांगितलेय तिन्ही पक्ष एकत्रित येऊन, तिन्ही नेते बसून एकविचाराने आमचा मुख्यमंत्री ठरवू. महाराष्ट्रातील जनताच मुख्यमंत्री ठरवते. तीच आमचा महायुतीचा मुख्यमंत्री बनण्यासाठी आम्हाला जनाधार देत असल्याचे चित्र राज्यभर दिसतेय, असा विश्वासही दरेकरांनी (Pravin Darekar) व्यक्त केला.

शिवाजी पार्क येथील मैदानावरून संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर बोलताना दरेकर म्हणाले की, नियमाप्रमाणे ज्यांना मैदान देणे शक्य आहे त्यांना महापालिका, निवडणूक यंत्रणा मैदान देईल. संजय राऊत यांनी भावनिक वातावरण करू नये. बाळासाहेबांचा विचार, शिवसेना एकनाथ शिंदेंसोबत आहे. तो वारसा, विचार पुढे नेण्याचे काम एकनाथ शिंदे करताहेत. राऊत यांनी आता बाळासाहेबांच्या नावावर मतं मागण्याचे बंद करावे. तुम्ही बाळासाहेबांचा विचार मातीत घातलेला आहे. बाळासाहेबांवर प्रेम करणारा मराठी माणूस, हिंदुत्ववादी जनता तुम्हाला मतदान करणार नाही. तुमच्या भावनिक भूलथापांना बळी पडणार नाही.

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election : निवडणुकीच्या हंगामात इव्हेंट कंपन्या जोमात)

वणी येथे निवडणूक अधिकाऱ्यांकडून उद्धव ठाकरे यांची बॅग तपासण्यात आली. त्यावर बोलताना दरेकर म्हणाले की, उद्धव ठाकरे या देशाचे स्पेशल नागरिक नाहीत. देशातील प्रत्येक नागरिक मग तो कुणीही असो त्याची बॅग तपासण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला, यंत्रणेला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचीही हेलिकॉप्टरमधून उतरल्यावर बॅग तपासल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेले आहे. मुख्यमंत्र्यांचीही यातून सुटका झालेली नाही. या देशात संविधानाने, लोकशाही मार्गाने निवडणूक आयोगाला तपासणीचा अधिकार दिलेला आहे. उद्धव ठाकरेंनी यात वाईट वाटून घेण्याचे कारण नाही. अशा प्रकारे बॅगेतून काही नेत नसाल तर चिंता करायचे कारण नाही.

उद्धव ठाकरेंनी केलेल्या विधानावर प्रहार करत दरेकर म्हणाले की, बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देऊन काँग्रेसच्या मांडीला मांडी लावण्याचे पाप उद्धव ठाकरेंनी केलेय. त्याचे पापक्षालन पहिले करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काय आहेत हे देशाला माहित आहे. बाळासाहेब आणि मोदींचे दृढसंबंध संपूर्ण देशाने, महाराष्ट्राने पाहिलेत. शब्दशा अर्थ न घेता आपण बाळासाहेबांचा वारसा चालवीणारे पुत्र म्हणून त्यांच्या विचारांचे नकलीपण जपताय. त्यांचे विचार जपत नाही. बाळासाहेबांच्या विचारधारेला विरोध केलेल्या काँग्रेससोबत साटेलोटे करताय त्या अर्थाने मोदी नकली वारसदार बोलल्याचे दरेकरांनी स्पष्ट केले. तसेच निवडणुका असल्याने प्रत्येकजण आपापल्या परीने प्रचार करतोय. हिंदुत्व, हिंदू धर्माची पताका फडकविण्यासाठी भाजपा, महायुती कटीबद्ध आहे. उद्धव ठाकरेंनी मतांच्या लाचारीसाठी तुष्टीकरण चालू ठेवावे, असा टोलाही दरेकरांनी (Pravin Darekar) ठाकरेंना लगावला.

(हेही वाचा – ९ वर्षांच्या मुलींचा निकाह होणार; Iraq मध्ये मुसलमान महिलांच्या लैंगिक शोषणाचा कायदा)

…ही लाच नाही तर बहिणींचा सन्मान आहे

लाडक्या बहिणींची योजना बंद होणार नाही हे आमच्या तिन्ही नेत्यांनी सांगितलेय. आपले राज्य सरकार मजबूत आहे. आर्थिक सक्षमता आपल्याकडे आहे. पैसे उभारण्याची धमक आणि ताकद महायुतीत आहे. महाराष्ट्रातील जनता विरोधकांना सत्तेत आणणार नाही त्यामुळे त्यांनी काळजी करू नये. ही लाच नाही हा बहिणींचा सन्मान आहे. उलटपक्षी आणखी जास्तीची रक्कम देऊन महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी काय करता येईल हा पुढील टप्पा लाडक्या बहिणींसाठी महायुती सरकारचा असेल, असेही दरेकर (Pravin Darekar) म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.