Maharashtra Assembly Election : अहिल्यानगर जिल्ह्यात विखे-पाटील, थोरातांची प्रतिष्ठा पणाला!

87
Maharashtra Assembly Election : अहिल्यानगर जिल्ह्यात विखे-पाटील, थोरातांची प्रतिष्ठा पणाला!
  • खास प्रतिनिधी 

अहिल्यानगर जिल्ह्यातील दिग्गज राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात, रोहित पवार, राम शिंदे, प्राजक्त तनपुरे यांची प्रतिष्ठा या विधानसभा निवडणुकीत पणाला लागली आहे. या जिल्ह्यात एकूण १२ मतदारसंघ आहेत. (Maharashtra Assembly Election)

आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याची ओळख

अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्हा. राज्य आणि केंद्र शासनाने या जिल्ह्याचे नाव बदलले असले तरी आजही निवडणूक आयोगाच्या लेखी नोंदीत अहमदनगर हिच नोंद कायम आहे. हा जिल्हा ऐतिहासिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, पर्यटन असा विविधतेने नटलेला आहे. जिल्ह्याची ओळख म्हणजे सहकाराची पंढरी. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, कळसूबाई शिखर, हरिषचंद्र गड, चांदबिबीचा महाल, पट्टा किल्ला अशी ऐतिहासिक स्थळे या जिल्ह्यात आहेत तर शिर्डी, शनिशिंगणापूर, मोहटा देवी अशी धार्मिक तिर्थस्थळे असल्याने देशतीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याची ओळख तयार झाली आहे. (Maharashtra Assembly Election)

(हेही वाचा – हेलिकॉप्टरमधून उतरताच बॅग तपासल्यावर Uddhav Thackeray संतापले )

१५१ उमेदवार निवडणूक रिंगणात

जिल्ह्यातील १२ पैकी ७-८ विधानसभा मतदारसंघांत महाविकास आघाडीचे आमदार असून विधानसभा निवडणुकीत महायुतीचा कस लागणार आहे. एकूण २५९ उमेदवारांनी १२ मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केले होते तर त्यातील १०९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आणि अखेर १५१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. बारा संघांपैकी जवळपास आठ मतदारसंघात बंडखोरी झाली असून महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही बाजूला अधिकृत उमेदवारांची कसोटी लागणार आहे. (Maharashtra Assembly Election)

संगमनेरमध्ये थोरात

संगमनेरमध्ये महाविकास आघाडीचे आमदार बाळासाहेब थोरात विरुद्ध महायुतीचे अमोल खताळ यांच्यात थेट लढत होत असली तरी थोरात यांचा या मतदारसंघावर प्रभाव असल्याचे चित्र आहे. माजी खासदार भाजपाचे सुजय विखे पाटील यांनी लोकसभा निवडणूक हरल्यानंतर त्यांनी या मतदारसंघातून निवडणुकीची तयारी केली होती मात्र पक्षाने पिता-पुत्र दोघांना तिकीट न देण्याची भूमिका घेतल्याने थोरातांचा सामना खताळ यांच्याशी होणार आहे. अकोलेमधून महायुतीचे (राष्ट्रवादी-अजित पवार) आमदार डॉ. किरण लहामटे विरुद्ध महाविकास आघाडीचे (राष्ट्रवादी-शप) अमित भांगरे यांच्यात लढत होत आहे. या मतदारसंघात भाजपाचे बंडखोर वैभव पिचड, राष्ट्रवादीचे (शप) बंडखोर मारुती मेंगाळ आणि शिवसेना उबाठाचे बंडखोर मधुकर तळपाडे हेही उमेदवारी करणार आहेत. त्यामुळे येथे बहुरंगी लढत होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Assembly Election)

(हेही वाचा – अयोध्येतील श्रीराम मंदिर उडवणार; खलिस्तान समर्थक Gurpatwant Singh Pannun पुन्हा बरळला)

शिंदे यांची ही अस्तित्वाची लढाई

कर्जत-जामखेडमध्ये भाजपाचे विधान परिषद आमदार राम शिंदे यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीतील शरद पवार यांचे नातू, आमदार रोहित पवार यांच्यात लढत होणार आहे. १९९० पर्यंत काँग्रेसचे या मतदार संघावर वर्चस्व होते तर १९९५ पासून मतदारसंघ भाजपाने खेचून घेतला आणि २०१९ पर्यंत कायम राखला. २००९ आणि २०१४ ला राम शिंदे निवडून आले. त्यांनी मतदारसंघावर पकड बसवली पण २०१९ मध्ये मंत्री पदी असतानाही रोहित पवार यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. आता पुन्हा शिंदे विरुद्ध रोहित पवार अशी लढत होणार असून शिंदे यांची ही अस्तित्वाची लढाई असेल. (Maharashtra Assembly Election)

शिर्डीत विखे पाटील

शिर्डी मतदारसंघातून महायुतीचे (भाजपा) उमेदवार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध महाविकास आघाडीच्या प्रभावती घोगरे यांच्यात लढत होणार असून भाजपचे डॉ. राजेंद्र पिपाडा यांनीही अपक्ष म्हणून अर्ज आहे. तरीही विखे पाटील यांचा राजकीय वारसा लक्षात घेता त्यांना विजयासाठी फारसे आव्हान असल्याचे दिसत नाही. घोगरे यांच्या प्रचारासाठी निलेश लंके विशेष सभा घेत आहेत. श्रीरामपूरमध्ये महायुतीकडून शिवसेनेचे भाऊसाहेब कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे लहू कानडे तर महाविकास आघाडीकडून (काँग्रेस) हेमंत ओगले यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. कोपरगावमध्ये महायुतीकडून आमदार आशुतोष काळे व महाविकास आघाडी संदीप वर्षे यांच्यात लढत होईल. (Maharashtra Assembly Election)

(हेही वाचा – Delhi Assembly Election : निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलाला दिल्लीमध्ये उधाण)

राहुरीत तनपुरे

राहुरी मतदारसंघात महायुतीचे (भाजपा) शिवाजीराव कर्डिले विरुद्ध महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी (शप) आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यात पुन्हा लढत होणार आहे. कर्डिले यांची राजकीय कारकीर्द आणि जयंत पाटील यांचा भाचा म्हणून तनपुरे यांचेही पारडे जड असल्याने येथील लढत अधिक रंगतदार होणार आहे. पारनेरमध्ये महायुतीचे काशीनाथ दाते विरुद्ध महाविकास आघाडीच्या राणी लंके यांच्यात लढत आहे. (Maharashtra Assembly Election)

श्रीगोंदात पाचपुते

श्रीगोंदा मतदारसंघातून महायुतीच्या (भाजपा) विक्रम बबनराव पाचपुते विरुद्ध महाविकास आघाडीच्या (शिवसेना उबाठा) अनुराधा नागवडे यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. येथे माजी आमदार राहुल जगताप, घनश्याम शेलार, सुवर्णा पाचपुते हेही अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नेवासेतून महायुतीचे (शिवसेना) विठ्ठलराव लंघे विरुद्ध महाविकास आघाडीतर्फे (शिवसेना उबाठा) आमदार शंकरराव गडाख तसेच माजी आमदार (प्रहार जनाशक्ती) बाळासाहेब मुरकुटे यांच्यात लढत होत आहे. शेवगावमधून महायुतीच्या आमदार मोनिका राजळे विरुद्ध महाविकास आघाडीचे अॅड. प्रताप ढाकणे निवडणूक रिंगणात आहेत. (Maharashtra Assembly Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.