BSF ने 600हुन अधिक रोहिंग्या-बांगलादेशींना घुसखोरी करताना त्रिपुरामध्ये पकडले

74

सीमा सुरक्षा दलाने (BSF) 2024 मध्ये 600 हून अधिक बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना अटक केली आहे. हे सर्व जण त्रिपुरा आणि बांगलादेशमधील आंतरराष्ट्रीय सीमेवरून आत जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्यासोबत त्यांच्या भारतीय मदतनीसांनाही अटक करण्यात आली आहे.

(हेही वाचा मालेगावात Vote Jihad साठी कोट्यवधी रुपयांचे बेकायदा बँक व्यवहार; १२ हिंदू तरुणांच्या नावाने बँक खाती काढून केला घोटाळा)

BSFचे आयजी पटेल पीयूष पुरुषोत्तम दास यांनी त्रिपुराचे खासदार कीर्ती देब बर्मा यांना नुकत्याच झालेल्या बैठकीत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, 2024 मध्ये 623 रोहिंग्या-बांगलादेशी आणि 52 भारतीय मदतनीसांना अटक करण्यात आली आहे. 623 पैकी 52 रोहिंग्या आहेत तर 571 बांगलादेशी आहेत. याशिवाय BSF ने 87 कोटी रुपयांचे ड्रग्जही जप्त केले आहेत. BSF ने बांगलादेश सीमेवर पाळत ठेवली असून राज्य पोलिसांनाही सहकार्य करत असल्याचे म्हटले आहे. बीएसएफ व्यतिरिक्त, त्रिपुरातील जीआरपीने 2024 मध्ये सुमारे 50 बांगलादेशी आणि रोहिंग्यांना अटक केली आहे. आगरतळा रेल्वे स्थानकावरून त्यांनी ही अटक केली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.