मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षांवरील १०३ ज्येष्ठ नागरिक, ११ दिव्यांग Voter ने केले गृह मतदान

311
भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता २० नोव्हेंबर, २०२४ रोजी मतदान होणार आहे. मुंबई शहर जिल्ह्यात मतदानाकरिता मतदान केंद्रावर उपस्थित राहू शकत नसलेल्या व प्रपत्र १२ ड भरून दिलेल्या ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांना (Voter) टपाली मतदान पथकामार्फत गृह टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सदर सुविधेअंतर्गत मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात सोमवारी एकूण ११४ ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांनी गृह टपाली मतदान केले.
WhatsApp Image 2024 11 11 at 10.06.33 PM
मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील  एकूण ११८ ज्येष्ठ नागरिक मतदार (Voter) असून त्यापैकी १०३ अर्जदारांनी तर १३ पैकी ११ दिव्यांग मतदारांनी मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे प्रपत्र १२ ड भरून जमा केले होते. प्रपत्र १२ ड भरून जमा केलेल्या ११४ अर्जदारांचे गृह टपाली मतदान आज घेण्यात आले. मुंबई शहर जिल्ह्यातील दहा मतदारसंघात ८५ वर्षावरील २१३७ ज्येष्ठ नागरिक मतदार (Voter) व २१९ दिव्यांग मतदार गृह टपाली मतदानासाठी पात्र ठरले आहेत. १६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत गृह टपाली मतदान घेतले जाणार आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.