Kartiki Ekadashi 2024: कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरी दुमदुमली; पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

194

कार्तिकी सोहळ्यासाठी पंढरी नगरी सज्ज झाली असून, मंगळवार १२ नोव्हेंबर रोजी पंढरी नगरीत लाखो भाविक दाखल झाले आहेत. दरम्यान, निवडणूक आचारसंहितेमुळे (Electoral Code of Conduct) शासकीय महापूजा पुणे विभागाचे महसूल आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Pune Divisional Commissioner Chandrakant Pulkundwar) यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली. यावेळी लातूर (Latur) जिल्ह्यातील उमरगा येथील भाविक दाम्पत्य बाबुराव सगर आणि सागरबाई सगर या मानाच्या वारकरी दाम्पत्याला शासकीय पूजेत सहभागी होण्याचा मान मिळाला. (Kartiki Ekadashi 2024)

दरम्यान, यंदा प्रथेप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री हे कार्तिकीची शासकीय महापूजा करत असतात. मात्र, सध्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यानं प्रशासनानं पुण्याचे महसूल आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते ही महापूजा संपन्न झाली. यंदा कार्तिकी सोहळ्यासाठी सहा लाखांपेक्षा जास्त भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. संपूर्ण पंढरी नगरी विठुनामाच्या जयघोषानं दुमदुमून गेली आहे.

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election : अहिल्यानगर जिल्ह्यात विखे-पाटील, थोरातांची प्रतिष्ठा पणाला!)

“मी बालपणापासून देवाच्या दर्शनाला येत आलोय, प्रत्येकवेळी एक वेगळं समाधान आणि आनंद विठ्ठल दर्शनानं मिळत होता. मात्र, यावेळी तो खूपच खास होता, अशा भावनाही डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी व्यक्त केल्या आहेत.” दरम्यान, यावेळी कार्तिकी सोहळ्यानिमित्त विठ्ठल मंदिराला फुलांची आरास करण्यात आली आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.