दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्याचा आरोप; NIA चे देशभरात ९ ठिकाणी छापे

81
पोलिसांचा खबरी असल्याचा संशय घेत केली हत्या; NIA ला तुरुंगातील माओवाद्यांची करायची आहे चौकशी

दहशतवादी संघटना अल-कायदाशी (Al-Qaeda) संबंधित संशयितांच्या विरोधात राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) सोमवार, 11 नोव्हेंबर रोजी देशभरात मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबवली. या कारवाईअंतर्गत जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir), कर्नाटक, पश्चिम बंगाल, बिहार, त्रिपुरा आणि आसामसह नऊ ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छापेमारीत टेरर फंडिंगशी संबंधित अनेक डिजिटल उपकरणे, बँकिंग कागदपत्रे आणि पुरावे समोर आले आहेत. एनआयएचा हा छापा 2023 मध्ये दाखल झालेल्या एका खटल्याशी संबंधित आहे.

(हेही वाचा – Kartiki Ekadashi 2024: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रचारसभेत व्यस्त; कार्तिकी एकादशीला पंढरपुरात महापूजा केली कुणी?)

बांगलादेशी नागरिकांचा हात

कारवाईदरम्यान एनआयएने मोबाईल फोन आणि डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत. जप्त करण्यात आलेल्या बँकिंग दस्तऐवजांमध्ये बांगलादेशातून (Bangladesh) दहशतवादाला निधी दिल्याचे समोर आले आहे. अल कायदाला निधी पुरवणाऱ्या अनेक बांगलादेशी नागरिकांचे संपर्क उघड झाले आहेत, ज्यांच्यामार्फत हा निधी भारतात पोहोचवला जात होता. हे संशयित बांगलादेशस्थित अल कायदा नेटवर्कशी संबंधित आहेत. हा गट भारतात दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय तरुणांना भडकवण्याचा आणि निधी देण्याचा कट रचत होता.

भारतातील तरुणांना कट्टरपंथी बनविण्याचा प्रयत्न

संशयित अल कायदाला निधी देण्याचा आणि भारतातील तरुणांना कट्टरपंथी बनविण्याचा प्रयत्न करत होते. भारतीय तरुणांना कट्टरपंथी विचारसरणीकडे आकर्षित करून त्यांना दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी करून घेण्याचा आरोपीचा उद्देश होता. अल कायदाशी संबंधित अनेक बांगलादेशी नागरिक या कटात सामील होते, असे निवेदन एनआयएने (NIA) प्रसारित केले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.