Maharashtra Assembly 2024 : राज्यात प्रचाराचा धुरळा, पंतप्रधान मोदींच्या ३, तर राहुल गांधींच्या २ सभा होणार!

129

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly 2024) प्रचार संपण्यासाठी अवघे सात दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे विधानसभेच्या प्रचार सभांचा जोर आता शिगेला पोहोचत असून, मंगळवारी १२ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या तीन जाहीरसभा तर लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या दोन प्रचारसभा एकाच दिवशी होणार आहेत.

प्रचार संपण्याचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. १८ नोव्हेंबरला प्रचार संपेल. २० नोव्हेंबरला मतदान आहे. प्रचार संपायला ७ दिवस शिल्लक असताना महायुती आणि महाविकास आघाडीचे दिग्गज नेते, अन्य पक्षांच्या नेत्यांनी वातावरण ढवळून काढले आहे. दरम्यान, १२ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सभा चिमूर, सोलापूर आणि पुणे येथे होतील. तर राहुल गांधींच्या सभा चिखली (जि. बुलडाणा) आणि गोंदिया येथे होतील. या निमित्ताने एकाच दिवशी हे दोन दिग्गज नेते प्रचाराच्या मैदानात उतरत आहेत. या शिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या दोन सभा मुंबईत होतील तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) यांच्या सभा अकोला, अमरावती व नागपुरात होत आहेत.

(हेही वाचा – परीक्षार्थीचे गुण ही खाजगी माहिती नाही; Bombay High Court चा निर्वाळा)

दरम्यान प्रचार सभेत जाहीरनामे एकमेकांच्या टीकेच्या रडारवर आहेत. शरद पवार, एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, अजित पवार, नाना पटोले आदी नेत्यांच्या दणकेबाज सभांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.