Pandurang Mahadev Bapat : तुम्हाला माहिती आहे का, सेनापती बापट यांना अवगत होतं बॉम्ब बनवण्याचं कौशल्य?

सेनापती बापट यांचा जन्म १२ नोव्हेंबर १८८० साली पारनेर येथे एका मराठी चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला.

65
Pandurang Mahadev Bapat : तुम्हाला माहिती आहे का, सेनापती बापट यांना अवगत होतं बॉम्ब बनवण्याचं कौशल्य?
Pandurang Mahadev Bapat : तुम्हाला माहिती आहे का, सेनापती बापट यांना अवगत होतं बॉम्ब बनवण्याचं कौशल्य?

पांडुरंग महादेव बापट (Pandurang Mahadev Bapat) म्हणजेच सेनापती बापट हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक सेनानी होते. मुळशी सत्याग्रहाच्या वेळेस त्यांनी लोकांचं नेतृत्व केलं होतं. त्यांनी केलेल्या नेतृत्वामुळे त्यांना सेनापती म्हणून संबोधलं जाऊ लागलं. १९७७ साली भारत सरकारने त्यांच्या स्मरणार्थ एक टपाल तिकीट जारी केलं होतं.

सेनापती बापट (Pandurang Mahadev Bapat) यांचा जन्म १२ नोव्हेंबर १८८० साली पारनेर येथे एका मराठी चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचं कुटुंब मूळचं रत्नागिरी इथलं होतं. त्यांचं शिक्षण डेक्कन कॉलेजमध्ये झालं. त्यानंतर ते सरकारी शिष्यवृत्ती घेऊन इंजिनीअरिंगचा अभ्यास करण्यासाठी ब्रिटन येथे गेले.

ब्रिटन इथल्या वास्तव्यादरम्यान सेनापती बापट हे इंडिया हाऊस येथे रहायचे. त्यांनी तिथे आपला बहुतेक वेळ अभ्यास करण्याऐवजी बॉम्ब बनवण्याचं कौशल्य आत्मसात करण्यात घालवला. या काळादरम्यान त्यांचा संपर्क सावरकर बंधू विनायकराव आणि गणेशराव यांच्याशी झाला. सेनापती बापट हे लंडनमधल्या संसदेची सभागृहे उडवण्याचा विचार करत होते. सेनापती बापट (Pandurang Mahadev Bapat) यांनी आपलं बॉम्ब बनवण्याचं कौशल्य हे भारतात परत आल्यानंतर इतरांनाही शिकवलं.

(हेही वाचा – Virat Kohli : जेव्हा विराट कोहली अख्ख्या संघाच्या एक दिवस आधी ऑस्ट्रेलियाला पोहोचतो)

१९०८ साली अलिपूर येथे बॉम्बस्फोट केल्यानंतर सेनापती बापट हे अज्ञातवासात गेले. अज्ञातवासात असताना सेनापती बापट यांनी देशभ्रमण केलं. त्या वेळेस त्यांना असं आढळून आलं की, बहुसंख्य भारतीय लोकसंख्येला आपला देश हा परकियांच्या राजवटीत आहे, हे समजत देखील नाही. तेव्हा त्यांनी लोकांना ब्रिटीश सरकारविरुद्ध जागरूक करायला सुरुवात केली.

१९१२ साली बॉम्बस्फोट केल्याच्या संदर्भात सेनापती बापट यांनी अटक करण्यात आली. तसेच त्यांना तुरुंगवासाची शिक्षाही झाली. १९१५ सालपर्यंत ते तुरुंगातून बाहेरही आले होते. सेनापती बापट हे एक अनुभवी क्रांतिकारक होते. ते पुणे परिसरातल्या इतर अनेक प्रभावशाली व्यक्तींपैकी एक होते. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या मराठा सैनिकांमध्ये सेनापती बापट हेही सामील झाले होते. त्यांनी लोकमान्य टिळकांसोबतही स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता. पुणे आणि मुंबईतल्या प्रमुख सार्वजनिक रस्त्यांना त्यांच्या सन्मानार्थ सेनापती बापट रस्ता असं नाव देण्यात आलं आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.