पंतप्रधानांच्या सभेसाठी काढले शिवतीर्थावरील दीपोत्सवाचे कंदिल; Raj Thackeray यांचा संताप

146
पंतप्रधानांच्या सभेसाठी काढले शिवतीर्थावरील दीपोत्सवाचे कंदिल; Raj Thackeray यांचा संताप
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly 2024) अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. तत्पूर्वी प्रचारसभांचा जोर शिगेला पोहोचला आहे. दरम्यान, १४ नोव्हेंबर रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क (Shivaji Park) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचीही सभा पार पडणार आहे. मात्र, या सभेपूर्वीच शिवाजीपार्कवर मनसेने दीपोत्सवासाठी (Deepotsav by MNS) लावलेले कंदील सुरक्षेच्या कारणास्तव काढण्यात आले आहेत. यावरूनच आता राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. (Raj Thackeray)

राज ठाकरे म्हणाले, की…
दिंडोशी विधानसभेत यंदा तिरंगी लढत होणार आहे. दरम्यान, दिंडोशी विधानसभा (Dindoshi Assembly) मतदारसंघात मनसेचे उमेदवार भास्कर परब (Candidate Bhaskar Parab) यांच्या प्रचारांसाठी, ११ नोव्हेंबर रोजी राज ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी विविध मुद्दयासंबंधी प्रशासनाला लक्ष्य केलं आहे. यावेळी प्रचार सभेत राज ठाकरे म्हणाले की, आपण दिवाळीला शिवाजी पार्कवर दीपोत्सव साजरा करतो. त्याचे व्हिडीओ आपण सर्वांनीच बघितले असतील. अनेक जण तिथे येऊन फोटो किंवा व्हिडीओ काढतात. पण रविवारी अचानक याठिकाणी वीज बंद करण्यात आली. तसेच सर्व मीटर्स बेस्टवाले घेऊन गेले, कारण काय? तर १४ तारखेला तिकडे पंतप्रधानांची सभा आहे. मुळात दिवाळीच्या कंदीलांचा आणि पंतप्रधानांच्या सुरक्षेचा काय संबंध? पंतप्रधान आले असते आणि त्यांनी तिकडे कंदील बघितले असते, तर त्यांनाही आनंद झाला असता. नको तिकडे सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करतात, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

(हेही वाचा – Pandurang Mahadev Bapat : तुम्हाला माहिती आहे का, सेनापती बापट यांना अवगत होतं बॉम्ब बनवण्याचं कौशल्य?)

पंतप्रधान येतात अन् तुम्ही…

या महाराष्ट्रात अनेकदा दहीहंडी सणावर बंदी आणण्याचा प्रयत्न झाला, गणपतींचे मंडप उभारण्याला विरोध झाला, त्यावेळी मसनेचे आवाज उठवला आणि या सणांवरची बंदी उठवली. आज हिंदुत्त्ववादी विचारांचे पंतप्रधान तिथे येतात आणि तुम्ही दिवाळीचे कंदील बंद करता म्हणजे तुमची कमालच आहे. तसेच, दिवाळी हा आपला हिंदू सण आहे. तो सणासारखा साजरा नाही, करायचा तर कसा करायचा? दरवर्षी हे कंदील तुळशीच्या लग्नापर्यंत असतात, त्यानंतर आपण ते काढतो. असे विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.